
बेंगळुरू (कर्नाटक) – जगप्रसिद्ध मैसुरू दसरा उत्सवाच्या उद्घाटनास धर्मांध मुसलमान लेखिका बानू मुश्ताक यांना काँग्रेस सरकारने निमंत्रण दिले आहे. काँग्रेस सरकारच्या या निर्णयाला भाजपने कर्नाटक उच्च न्यायालय आव्हान दिले आहे. या प्रकरणी भाजपचे माजी खासदार प्रताप सिम्हा यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. याचिकेत बानू मुश्ताक यांच्या निवडीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
🚨 Former MP @mepratap moves High Court seeking stay on Banu Mushtaq’s Dasara inauguration!
⚖️ Petition points:
1️⃣ Vigraha of Sri Chamundeshwari Devi is worshipped during inauguration. Banu Mushtaq holds anti-Hindu & anti-Kannada views.2️⃣ Even Mysuru Royal Family has opposed… https://t.co/aK6LYJZcoO pic.twitter.com/H9jTKD2qvv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 6, 2025
सिम्हा यांनी याचिकेत म्हटले की,
१. दसरा उत्सवाच्या उद्घाटनात श्री चामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीची पूजा केली जाते. बानू मुश्ताक हिंदु आणि कन्नड विरोधी विचारसरणीच्या आहेत. राज्य सरकारने एकतर्फीपणे बानू मुश्ताक यांची निमंत्रणासाठी निवड केली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला स्थगिती द्यावी.
२. मैसुरूच्या राजघराण्यानेही सरकारच्या या भूमिकेचा निषेध केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. बानू मुश्ताक यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्याचे न्यायालयाने निर्देश द्यावेत, अशी विनंती आहे.
लढा देण्यासाठी आम्ही तयार ! – मुख्यमंत्री सिद्धरामय्या

विजयपूर (कर्नाटक) – माजी खासदार सिम्हा यांच्या याचिकेवर कर्नाटकाचे काँग्रेसी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, प्रताप सिम्हा न्यायालयात गेल्याचा मला पुष्कळ आनंद झाला आहे. न्यायालय निर्णय घेईल. आम्हीही कायदेशीर संघर्ष करू. सिम्हा यांनी यात राजकीय संघर्ष केला, तर आम्ही सगळ्याला उत्तर देऊ.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, यापूर्वी निस्सार अहमद यांनी मैसुरू दसरा उत्सवाचे उद्घाटन केले होते, तेव्हा सिम्हा न्यायालयात का गेले नाहीत ? (निस्सार अहमद यांचा हिंदूंच्या देवतांप्रती आदरभाव आहे. तसेच हिंदु धर्म हा व्यापक असल्याने हिंदूंनी अहमद यांच्या निमंत्रणाला साहजिकच विरोध केला नाही ! – संपादक) सिम्हा यांना न्यायालयात जाऊ द्या.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
संपादकीय : अवघ्या पावणे दोन मासांत शिक्षा !
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त