
बेंगळुरू (कर्नाटक) – ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा देऊन कारावास भोगलेल्या राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारे मानधन राज्य सरकारने अनेक महिन्यांपासून थकवले आहे. या थकलेल्या रकमेने ४ कोटी ८५ लाख रुपयांचा आकडा पार केला आहे. राज्यातील १५० स्वातंत्र्यसैनिकांना प्रतिमास १० सहस्र रुपये मानधन मिळते. सरकारने अनेक महिन्यांपासून हे मानधन दिले नाही. याविषयी स्वातंत्र्यसैनिकांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
या संदर्भात महसूलमंत्री कृष्णा बायरेगौडा म्हणाले, ‘‘राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील स्वातंत्र्यसैनिकांचे मासिक मानधन थकले असल्याचा विषय माझ्या निदर्शनास आला आहे. हे मानधन टप्प्याटप्प्याने दिले जाईल. (वास्तविक मानधन का थकवण्यात आले, याची माहिती काँग्रेस सरकार देणार का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाकाँग्रेसवाल्यांनीच स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता, असे वारंवार सांगून टेंभा मिरवणारे काँग्रेसवाले आज स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान निधी थकवत आहेत. यावरून काँग्रेसवाल्यांच्या देशभक्तीवर कुणी प्रश्न उपस्थित केला, तर त्यात चुकीचे ते काय ? |
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !
संपादकीय : ‘विद्यार्थीहिताय ।’
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !