वामन जयंती (४.९.२०२५) या दिवशी पू. वामन राजंदेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईला जाणवलेली त्यांच्या संदर्भातील सूत्रे पुढे दिली आहेत.
पू. वामन राजंदेकर यांच्या चरणी त्यांच्या ७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. खेळ खेळतांनाही देवता किंवा संत यांच्या भूमिका न करता त्यांच्या सेवकांच्या भूमिका करणे
‘सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ७ वर्षे) हे त्यांची बहीण कु. श्रिया (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय १४ वर्षे) हिच्याशी घरात खेळतात. त्या वेळी ते विविध देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांच्या संदर्भातील खेळ खेळतात, उदा. ते श्रीकृष्ण, श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, शंकर महाराज, श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनातील प्रसंगांच्या संदर्भात खेळ खेळतात. ते दोघे हे खेळ खेळतांना असे लक्षात येते की, पू. वामन कधीच मूळ देवता किंवा संत यांच्या भूमिका करत नाहीत. ते नेहमी त्या देवता किंवा संत यांच्या सेवकांच्या भूमिका करतात, उदा. श्रीरामाचा सेवक हनुमान, श्रीकृष्णाचा मित्र सुदामा, श्रीस्वामी समर्थांचे भक्त चोळप्पा.
पू. वामन यांनी मोह, माया आणि अहंकार हे साधनेच्या मार्गातील असुर असल्याचे सांगणे

‘काही दिवसांपूर्वी मी आणि पू. वामन यांच्यात ‘आपल्या साधनेत कोणते घटक महत्त्वाचे आहेत’, याबद्दल चर्चा चालू होती. तेव्हा पू. वामन यांनी सांगितलेली सूत्रे आणि त्याविषयी आमच्यामध्ये झालेला संवाद पुढे दिला आहे.
पू. वामन : साधनेमध्ये मोह, माया यांच्या समवेतच अभिमान (अहंकार) हासुद्धा महत्त्वाचा घटक आहे. हे तिन्ही असुर आहेत. ते केवळ साधनेतच असतात असे नाही, तर ते सगळीकडेच असतात. जेव्हा आपल्यामध्ये अभिमान, मोह अथवा माया निर्माण होतात, तेव्हा आपण स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि इतरांना वाईट समजतो.

मी : आपल्यामध्ये मोह निर्माण झाला आहे, हे कसे ओळखायचे ?
पू. वामन : जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट एकापेक्षा अधिक प्रमाणात हवी असते, तेव्हा समजायचे की, आपल्यात मोह आला आहे आणि मोह कशाचाही होऊ शकतो.
मी : माया कशी कार्य करते ?
पू. वामन : माया म्हणजे आपल्याला वाटते की, आपल्यामध्ये देव (गुण किंवा चांगली गोष्ट) आहे आणि दुसर्यामध्ये असुर (दोष किंवा वाईट गोष्ट) आहे. माया म्हणजे स्वतःबद्दल भ्रम निर्माण होणे.
मी : आणि अभिमान कसा ओळखायचा ?
पू. वामन : अभिमान म्हणजे ‘आपणच श्रेष्ठ आहोत आणि इतर कनिष्ठ आहेत’, असे वाटणे. सतत दुसर्यांशी तुलना करणे, इतरांना न्यून लेखणे, स्वतःबद्दल बोलणे म्हणजे अभिमान.
‘पू. वामन यांनी ही सूत्रे नेहमीप्रमाणे सहजतेने आणि ओघवत्या वाणीत सांगितली. त्यांच्यासाठी सर्व सूत्रे सूर्याच्या लख्ख प्रकाशाप्रमाणे सुस्पष्ट होती. ‘आपल्याला हे सर्व नारायणच (टीप १) शिकवतात’, हे त्यांनी या वेळीही शरणागतभावाने सांगितले. ‘नारायणांच्या इच्छेविना आपल्या कुणालाच काहीही येत नाही’, हे सांगतांना त्यांची नारायणांवर असलेली दृढ श्रद्धा आणि भक्ती दिसून आली.’
टीप १ – पू. वामन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ‘नारायण’ म्हणतात.
– सौ. मानसी राजंदेकर, फोंडा, गोवा. (१२.७.२०२५)
२. अहं न वाढण्यासाठी खेळ खेळतांनाही देवता, संत आणि गुरु यांचा केवळ सेवक होणे
याविषयी मी पू. वामन यांना विचारल्यावर ते मला म्हणाले, ‘‘आपण कधीच मुख्य देवता, मूळ देवता किंवा संत यांच्या भूमिका करायच्या नाहीत. आपण नेहमी सेवकच व्हायचे असते. आपण देवता, संत आणि गुरु यांची सेवाच करायची असते. आपण देवाची भूमिका केल्यास आपला अहं वाढू शकतो. आपण खेळत असलो आणि खेळ हा खोटा असला, तरीही ‘दुसर्याकडून सेवा करून घेणे’, हे कधीच योग्य नसते. आपण नेहमी देवाचे सेवक व्हायचे असते, जसे हनुमान, लक्ष्मण, चोळप्पाकाका, तानाजी मालुसरे.
३. पू. वामन यांचे खेळणे आणि बोलणे यांतून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. पू. वामन खेळतांनाही शिष्यभावात रहाणेच योग्य मानतात.
आ. आपण विचार केला, तर प्रत्येकाला लहानपणापासूनच खेळ, नाटक इत्यादी प्रसंगी मुख्य भूमिका करायची असते; मात्र आपण संतांकडून साधनेच्या दृष्टीने पुष्कळ शिकून आणि समजून घेणे अपेक्षित आहे.
इ. पू. वामन यांच्यातील ‘गुरुसेवकभाव’ त्यांच्या अंतर्मनात रूजला आहे आणि ते त्याविषयी नेहमी सतर्क असतात. ते कितीही वेळ आणि आवडीने खेळत असले, तरीही एका क्षणासाठी किंवा गंमत म्हणूनही त्यांना ‘सेवकभावा’चा विसर पडत नाही.
ई. त्यांची साधनेच्या संदर्भातील सतर्कता पाहून लक्षात येते की, ‘त्यांची कोणतीच कृती अनावश्यक किंवा वेळ घालवण्यासाठी नसते. ते खेळतांनाही अनुसंधानात राहून एकाग्रतेने सहभागी होतात.’
उ. संतांचे भावविश्व वेगळे असते. ते स्थुलातून आमच्या समवेत असले, तरीही त्यांचे कार्य सूक्ष्मातून चालू असते.
४. एकदा प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आम्हाला म्हणाले होते, ‘‘तुम्ही पू. वामन यांच्याकडून केवळ शिका.’’ प.पू. गुरुदेवांचे ते वाक्य ब्रह्मसत्यच आहे.
‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेने पू. वामन यांचा आम्हाला सत्संग लाभून शिकायला मिळत आहे’, त्याबद्दल मी प.पू. गुरुदेव आणि पू. वामन यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांच्या आई), फोंडा, गोवा. (१६.७.२०२५)
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !