Jodhpur Maulana : भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली मदरशातील मौलानाने केले महिलांचे लैंगिक शोषण

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

आरोपी मौलाना

जोधपूर (राजस्थान ) – शहरात भूतबाधा आणि वशीकरण उतरवण्याच्या नावाखाली मदरसा चालवणारा मौलाना अफझल हा महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले आहे. (मदरसा चालवणारे मौलाना अनेक कुकृत्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर येत असतांना अशा मदरशांना टाळे ठोकून या मौलानांची कसून चौकशी करून त्यांना कारागृहात डांबणे आवश्यक आहे ! – संपादक) या अश्लील कृत्यांच्या संदर्भातील ५ व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची भावना आहे. त्याला जाब विचारण्यासाठी लोक त्याच्या दुकानात पोचले; मात्र दुकानाला टाळे ठोकून तो पसार झाल्याचे समोर आले.

१. मौलाना अफझल स्वतःला तंत्र-मंत्राचा जाणकार असल्याचे भासवत होता. ‘याद्वारे मी लोकांच्या समस्या दूर करू शकतो’, असा तो दावा करत असे. तो बहुतांश वेळा मूल नसलेल्या महिलांना लक्ष्य करत असे.

२. पोलिसांनी सांगितले की, याविषयी अधिकृतपणे कुठल्याही महिलेने स्वतःहून तक्रार केलेली नाही; मात्र पोलिसांनी स्वतःहून अन्वेषण चालू केले आहे. ‘सामाजिक दबाव आणि स्वतःची अपकीर्ती टाळण्यासाठी महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत’, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

अन्य वेळी हिंदूंच्या संतांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा वृत्तांना म्हणावी तशी प्रसिद्धी देत नाहीत, हे जाणा !