ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मोर्चाचा केला निषेध

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – देशातील २० शहरांमध्ये भारतीय स्थलांतिरांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. ‘भारतीय स्थलांतरितांमुळे ऑस्ट्रेलियात बेरोजगारी वाढत आहे’, असा अजब दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. ब्रिटननंतर भारतीय लोक ऑस्ट्रेलियातील दुसर्या क्रमांकाचा सर्वांत मोठा स्थलांतरितांचा गट आहे. जून २०२३ पर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वंशाचे ८ लाख ४ सहस्र रहिवासी होते. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या २ कोटी ७२ लाख एवढी आहे. ‘ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येमध्ये भारतियांची एकूण संख्या केवळ ३.२ टक्के आहे. असे असतांनाही ऑस्ट्रेलियातील बेरोजगारी आणि वाढती महागाई यांस भारतियांना उत्तरदायी का ठरवले जाते ?’, असा प्रश्न भारतियांकडून उपस्थित केला जात आहे. अलीकडच्या काळात ऑस्ट्रेलियातील भारतियांवरील आक्रमणांचे प्रमाणही वाढले आहे.
१. ऑस्ट्रेलियातील सत्ताधारी आणि विरोधी राजकारणी तेथील भारतीय समुदायाच्या सकारात्मक योगदानाची स्वीकृती देतात.
२. असे असले, तरी देशातील श्वेतवर्णीय, कट्टर ख्रिस्ती आणि कडवे उजवे हे तेथील भारतियांना विरोध करत आहेत. ‘ऑस्ट्रेलियामध्ये ख्रिस्ती धर्माव्यतिरिक्त अन्य धर्मीय येऊ नयेत’, असे त्यांना वाटते.
३. ‘मार्च फॉर ऑस्ट्रेलिया’ या नावाने मोर्चा काढणार्या आयोजकांनी पत्रक प्रसारित केले आहे. त्यात म्हटले आहे की, मागील १०० वर्षांत ऑस्ट्रेलियात जेवढे ग्रीक आणि इटाली येथील नागरिक ऑस्ट्रेलियात आले नाहीत, तेवढे भारतीय नागरिक मागील ५ वर्षांत ऑस्ट्रेलियात आले आहेत.
४. ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाचे लोक हे सत्ताधारी लेबर पार्टीचे समर्थक आहेत. हा पक्ष सुधारणावदी आणि डाव्या विचारसरणीचा समजला जातो. त्यामुळे पुढील निवडणुकीत त्यांच्या मतांचा ऑस्ट्रेलियाच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो, असे तेथील उजव्या विचारसरणीच्या लोकांना वाटते.
५. ऑस्ट्रेलियात कट्टर उजव्या विचारसरणीचे लोक हे विरोधी लिबरल पक्षचे समर्थक आहेत. त्यामुळे ते भारतीय वंशाच्या नागरिकांना विरोध करतात.
आंदोलक ‘नवनाझी’ ! – अँथनी अल्बानीज, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया
(नवनाझी म्हणजे जर्मनीतील नाझींप्रमाणे कट्टर जातीवादी आणि क्रूर विचारसरणी असणारे लोक)

पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले की, आंदोलन करणारे हे नवनाझी घटकांशी संबंधित आहेत. या निदर्शनात नवनाझी गट म्हणून ओळखल्या जाणार्या ‘नॅशनल सोशलिस्ट नेटवर्क’ या संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते. सामाजिक माध्यमांवर एकाने पोस्ट करून निषेधाचे समर्थन करणारे लोक महिलाविरोधी, श्वेत वर्चस्ववादी, हवामान पालट नाकारणारे, तसेच ट्रम्प समर्थक असल्याचे म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाकेवळ ऑस्ट्रेलियात नव्हे, तर जगभरात भारतीय स्थलांतरितांना विरोध, तसेच त्यांच्यावरील आक्रमणे वाढत आहेत. ही आक्रमणे करणारे कट्टरवादी श्वेतवर्णीय, तसेच कट्टर ख्रिस्ती यांचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !