
वेदमंत्र हो जिथे प्रकटले,ज्ञान अन् भक्ती यांची गंगा वाहे ।
ऋषिमुनींची तपोभूमी ही,दिव्य अनुभव चैतन्याचा ।
अभिमान अशा राष्ट्राचा,जयजयकार सनातन राष्ट्राचा ।। १ ।।
विद्या अन् कला यांचा सुरेख संगम, नित्य भजे जन गुरु-गोविंदम् ।
योगसाधना साधे सोहम्, घडे साक्षात्कार सात्त्विकतेचा ।
अभिमान अशा राष्ट्राचा, जयजयकार सनातन राष्ट्राचा ।। २ ।।
त्याग अन् शौर्य यांची इथे परंपरा, ईश्वर अवतरे अधर्म मिटवाया ।
गगनी भगवी विजयपताका, वारसा दिव्य गुरुपरंपरेचा ।
अभिमान अशा राष्ट्राचा, जयजयकार सनातन राष्ट्राचा ।। ३ ।।
अंत समीप हा कलियुगाचा, अरुणोदय तो सत्ययुगाचा ।
विजयी रथ वैदिक धर्माचा, आनंद क्षण चराचर सृष्टीचा ।
अभिमान अशा राष्ट्राचा, जयजयकार सनातन राष्ट्राचा ।। ४ ।।
– सौ. गौरी कुलकर्णी, फोंडा, गोवा. (३०.३.२०२५)
धर्माच्या नावावर नद्या प्रदूषित करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! : Madras High Court
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !