मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

डावीकडून श्रीमती मधुरा तोफखाने, उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु स्वाती खाडये, तसेच श्री. संजय घाटगे

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) – मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास फोफावलेल्या ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल. यासाठी मंदिरातून धर्मशिक्षण फलक लावणे, नामजप लावणे, सामूहिक आरतीसाठी हिंदूंनी एकत्रित येणे, बालसंस्कारवर्ग चालू करणे, युवकांसाठी धर्मप्रशिक्षणवर्ग चालू करणे, असे उपक्रम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. त्या ‘कुंभार समाज विठ्ठल मंदिर’ येथे मंदिर विश्वस्तांसाठी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करत होत्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या साधिका सौ. सुरेखा पाटील यांनी केले. याप्रसंगी सनातन संस्थेच्या श्रीमती मधुरा तोफखाने, सांगली जिल्हा मंदिर समन्वयक श्री. संजय घाटगे, ‘धोंडीराम महाराज मठा’चे श्री. सुभाष पाटील, ‘कुंभार माळी समाज मंडपा’चे गुरव श्री. आनंदा माळी, काशीविश्वेश्वर मंदिराच्या सेविका सौ. दीपा संत्रा, सेवक श्री. मानसिंग पाटील, श्री. सुनील फल्ले, विनायक मंदिराचे सेवक श्री. सोमनाथ गणपती जंगम, काळा मारुति मंदिराचे पुजारी श्री. अमृत दिवाण यांसह अन्य उपस्थित होते.