|

मैसुरू (कर्नाटक) – हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी दसरा साजरा केला नव्हता का ? दसरा हा एक धर्मनिरपेक्ष उत्सव आहे. दसरा हा सांस्कृतिक राष्ट्रोत्सव आहे. त्याचे उद्घाटन कुणीतरी ठराविक व्यक्तीने किंवा ठराविक धर्माच्या व्यक्तीनेच करावे, असे काही नाही, असा जावईशोध कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना लावला. काँग्रेस सरकारने मैसुरू येथील दसरा महोत्सवाच्या उद्घाटनाला बानू मुश्ताक या धर्मांध मुसलमान लेखिकेला निमंत्रण दिल्यावरून चालू असलेल्या विरोधाला उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते.
⚡ Karnataka CM Siddaramaiah says: “Did Haider Ali & Tipu Sultan not celebrate Dasara?”
He even claims Dussehra is a “secular festival”!
Congress glorifying cruel aggressors like Haider Ali & Tipu shows its true mindset. Such politics must be rejected through the ballot!… pic.twitter.com/ACvgO8kKP8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 31, 2025
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले की,
१. दसरा हा कर्नाटक प्रांताचा सण (नाडसण) आहे. यामुळेच आम्ही बानू मुश्ताक यांना निमंत्रण दिले आहे.
२. ‘बानू मुश्ताक गोमांस खातात’, हे कुणी पाहिले आहे ? त्या गोमांस खात असल्याचे ढोंगी माणसे बोलत आहेत. मी त्यांच्या ढोंगी राजकारणाला महत्त्व देत नाही. (ढोंगी माणसांचे ढोंग सिद्ध करण्यासाठी खरेतर मुख्यमंत्र्यांनी बानू मुश्ताक यांना ‘तुम्ही गोमांस खाता का ?’, असा प्रश्न विचारला पाहिजे. तसे न करता विरोधकांना ढोंगी म्हणणे, यापेक्षा मोठे ‘ढोंग’ ते कोणते ? – संपादक) विरोधी पक्षनेते आर्. अशोक यांनी म्हटले होते की, दसरा महोत्सवाच्या उद्घाटनात गाय आणि नंदी यांची पूजा केली जाते. अशा वेळी गोमांस खाणारी व्यक्ती पूजा कशी करू शकते ?
संपादकीय भूमिकाहैदर अली आणि टिपू सुलतान यांच्यासारखे क्रूरकर्मा आक्रमक मुसलमानांचा अनुनय करणार्या काँग्रेसला जवळचे न वाटल्यासच आश्यर्च ! त्यामुळेच अशा पक्षाचे निवडणुकीद्वारे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणे, ही काळाची आवश्यकता ! |
हिंदूंनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला उत्तम प्रतिसाद: मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
कोणत्याही कारणास्तव मला माझा (हिंदु) धर्म सोडता येणार नाही ! – D. K. Shivakumar
Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त
LPG Price Hike : घरगुती सिलिंडर २९ रुपयांनी महागला