देवलापार केंद्राच्या मूर्ती अमेरिका-दक्षिण आफ्रिकेत जाणार !

नागपूर – रामटेक तालुक्यातील देवलापार येथील गो विज्ञान अनुसंधान केंद्राद्वारे निर्मित गोमय गणेशमूर्तींना गणेशभक्तांकडून पुष्कळ मागणी आली आहे. यामध्ये गायीचे शेण, मुलतानी माती आणि लाकडाच्या भुकटीच्या मिश्रणाचा वापर केलेला आहे. या मूर्ती अमेरिकेसह दक्षिण आफ्रिकेतही पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्राचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. हेमंत जांभेकर यांनी दिली. वर्ष २०२४ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर फक्त ५० मूर्ती बनवल्या होत्या. त्याला अपेक्षेपेक्षा पुष्कळ अधिक प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी १ सहस्र १०० मूर्ती सिद्ध केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. (अशी मूर्ती तयार करणे अशास्त्रीय असून शाडूमातीची मूर्तीच बनवणे आवश्यक ! – संपादक)

प्रा. हेमंत जांभेकर म्हणाले की,
१. देशी गायीच्या शेणापासून निर्मित श्री गणेशमूर्ती ही केवळ एक मूर्ती नसून एक आध्यात्मिक अनुभव आहे. पार्वती मातेने तिच्या शरिराच्या मळापासून श्री गणेशाची निर्मिती केली, त्याचप्रमाणे दिव्य प्रेरणेने या गणेशमूर्ती ३३ कोटी देवतांचे निवासस्थान असलेल्या गोमयापासून सिद्ध केल्या आहेत.
२. या मूर्ती १२ इंचाच्या आहे. किंमत १ सहस्र १०० रुपये आहे. यात देशी झाडांच्या बिया मिसळण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुंडीत वा मातीत विसर्जन केल्यानंतर ४-५ दिवसांनी रोपटे उगवते.
३. शेणापासून गणपति करतांना गोमय पावडर, माती, लाकडी पावडर आणि गौर गम पावडर यांचे मिश्रण केले जाते. लगदा साच्यामधून काढून मूर्ती घडवल्या जातात. यात शेणाचा वापर ८० टक्के असतो.
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !