
कोल्हापूर, ३० ऑगस्ट (वार्ता.) – उंचगाव येथील बाल हनुमान तरुण मंडळ हे गेल्या २१ वर्षांपासून मूर्तीशास्त्रानुसार शाडू मातीची श्री गणेशमूर्ती बसवते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती सनातन संस्थेने सिद्ध केलेल्या श्री गणेशमूर्तीप्रमाणे, तसेच त्या मापांप्रमाणे सिद्ध केलेली आहे. या मंडळाची स्थापना वर्ष १९८४ मध्ये झाली असून येथील श्री गणेश हा नवसाला पावणारा आहे. प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीने १ सहस्र भाविकांना महाप्रसाद दिला जातो. मंडळाचे स्वत:चे कार्यालय असून येथील विसर्जन मिरवणूक ही आदर्श असते. या मंडळात युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री. सुनील चौगुले, सर्वश्री संतोष (भाऊ) चौगुले, सचिन गुरव, अनिल गाताडे, नितीन निकम, गणेश चव्हाण, लखन चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह अन्य कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक