
एखाद्या जागी जेव्हा काही लोक कचरा टाकायला प्रारंभ करतात, त्या जागी हळूहळू नवीन लोकही कचरा टाकतात आणि कचरा साठायला लागतो. जेव्हा आपण ती जागा स्वच्छ करायला घेतो, तेव्हा नवीन कचरा तिथे लगेच टाकला जाऊ नये, याची दक्षता घेतो, म्हणजेच एक गोष्ट स्वच्छ करतांना तीच गोष्ट तिथे पुन्हा पुन्हा होऊ नये, याची काळजी घेतो. नाही तर या दुष्टचक्रात पूर्ण जागा कधीच स्वच्छ होणार नाही.
औषधांच्या साहाय्याने रोग न्यून करतांना शरिरात हेच पथ्याचे काम असते. औषधांनी आजार पूर्ण बरा होईपर्यंत तो वाढू नये, आपल्याकडून दक्षता घेतली की, आजार पूर्ण बरा व्हायला साहाय्य होते आणि नंतर थोडेफार अपथ्य सहन करायला शरीर सक्षमही होते.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
गरम शेक आणि गार शेक
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
‘ओव्हेरियन सिस्ट’ आणि आयुर्वेद
पावसाळ्याच्या काळात वाढत असलेली सांधेदुखी आणि पाठदुखी यांविषयी घ्यावयाची काळजी
वर्षा ऋतूचर्या : पावसाळ्यात आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेदाचे मार्गदर्शन !