जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियामध्ये लग्न समारंभ, सण किंवा मेजवान्या यांमध्ये मोठ्या आवाज स्पीकर, भोंगे आणि डीजे (मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा) लावले जाणे, हे सामान्य झाले आहे. त्यांचे आवाज इतके मोठे असतात की, खिडक्यांच्या काचा फुटतात, भिंतींना भेगा पडतात, वस्तू हलू लागतात. यामुळे प्रशासनाने त्यांच्या आवाजावर मर्यादा घातली आहे. कुठल्या ठिकाणी, कोणत्या वेळी स्पीकर, भोंगे वाजू शकतील, याची मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. पूर्व जावा प्रांताच्या राज्यपालांनी स्पष्ट केले की, हा नियम लोकांच्या आरोग्य आणि सुरक्षितता यांसाठी आहे. शांतता बिघडू नये; म्हणून आवाजावर नियंत्रण आवश्यक आहे.
जुलै महिन्यात स्थानिक इस्लामी परिषदेने फतवा (इस्लामी कायद्यानुसार एखाद्या सूत्रावर इस्लाममधील मान्यताप्राप्त व्यक्ती किंवा संस्था यांनी दिलेला निर्णय.) प्रसारित केला होता. त्यात स्पष्ट करण्यात आले होते की, लग्न, मिरवणूक किंवा कोणत्याही प्रसंगी जर भोंगे मोठ्या आजावात वाजवले गेले, तर लोकांना त्रास होतो, उपासनेत अडथळा येतो किंवा रस्त्यावर गोंधळ निर्माण होतो तर तो ‘हराम’ (इस्लामविरोधी) मानला जाईल.
भोंग्यांवर घातलेल्या मर्यादा
१. भोंग्यांचा आवाज १२० डेसिबलपेक्षा अधिक नसावा
२. मोर्चा किंवा मिरवणूक चालू असतांना ध्वनीची ८५ डेसिबलपर्यंत मर्यादा
३. शाळा, रुग्णालये आणि उपासना स्थळ यांठिकाणी भोंग्यांवर पूर्णपणे बंदी

पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !