बाराक्षार औषधांची मिश्रणे
चूक आणि सुधारणा
२३.८.२०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये बाराक्षर औषधांच्या मिश्रणांची सर्व नावे प्रसिद्ध करण्यात आली नव्हती, तसेच त्यांचे क्रमांकही चुकले होते. त्यामुळे बाराक्षार औषधांच्या सर्व २८ मिश्रणांची नावे योग्य क्रमांकासह पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. ते पुढे दिले आहेत.
चुकीसाठी संबंधित साधक प्रायश्चित्त घेत आहेत.
‘बाराक्षार औषधांची १ ते २८ नंबरपर्यंत मिश्रणे उपलब्ध आहेत. विशिष्ट आजारासाठी विशिष्ट नंबरचे मिश्रण दिले जाते. आजारांनुसार मिश्रणे पुढे दिली आहेत. पुढील अनुक्रम हा बाराक्षर औषधांच्या मिश्रणाचा क्रमांक दर्शवतो.

१. रक्तक्षय (Anaemia) : कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x, काली फॉस ३x, नेट्रम मूर ६x
२. दमा (Asthma) : काली फॉस ३x, मॅग फॉस ३x, नेट्रम मूर ६x, नेट्रम सल्फ ३x
३. आतड्याला सूज (Colitis) : कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x, मॅग फॉस ३x, नेट्रम सल्फ ३x
४. बद्धकोष्ठता (Constipation) : कल्केरिया फ्लोर ३x, काली मूर ३x, नेट्रम मूर ३x, सिलिशिया ६x
५. सर्दी-पडसे (Coryza Cold) : फेरम फॉस ३x, काली मूर ३x, काली सल्फ ३x, नेट्रम मूर ६x
६. खोकला (Cough) : फेरम फॉस ३x, काली मूर ३x, काली सल्फ ३x, नेट्रम मूर ६x, मॅग फॉस ६x
७. मधुमेह (Diabetes) : कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x, काली फॉस ३x, मॅग फॉस ३x, नेट्रम फॉस ३x, नेट्रम सल्फ ३x
८. जुलाब (Diarrhoea) : कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x, काली फॉस ३x, काली सल्फ ३x, नेट्रम सल्फ ३x
९. आमांश (संग्रहणी)(Dysentery) : फेरम फॉस ३x, काली मूर ३x, काली फॉस ३x, मॅग फॉस ३x,
१०. टॉन्सिल्स (घशातील ग्रंथी) मोठ्या होणे (Enlarged Tonsils) : कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x, काली मूर ३x
११. ज्वर (Fever) : फेरम फॉस ३x, काली मूर ३x, काली सल्फ ३x, नेट्रम मूर ३x, नेट्रम सल्फ ३x
१२. डोकेदुखी (Headache) : फेरम फॉस ३x, काली फॉस ३x, मॅग फॉस ३x, नेट्रम मूर ६x

१३. अंगावर पांढरे जाणे (Leucorrhoea) : कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x, काली फॉस ३x, काली सल्फ ३x, नेट्रम मूर ३x
१४. गोवर (Measles) : फेरम फॉस ३x, काली मूर ३x, काली सल्फ ३x
१५. मासिक पाळीच्या तक्रारी (Menstural disorder) : कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x, काली फॉस ३x, काली सल्फ ३x, मॅग फॉस ३x
१६. चिंता (Nervous debility) : कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x, काली फॉस ३x, मॅग फॉस ३x, नेट्रम मूर ६x
१७. मूळव्याध (Piles) : कल्केरिया फ्लोर ३x, फेरम फॉस ३x, काली मूर ३x, काली फॉस ३x
१८. हिरड्यांमध्ये पू होणे (Pyorrhea) : कल्केरिया फ्लोर ३x, कल्केरिया सल्फ ३x, सिलिशिया ६x
१९. संधीवात (Rheumatism and gout) : फेरम फॉस ३x, काली सल्फ ३x, मॅग फॉस ३x, नेट्रम सल्फ ३x
२०. त्वचा विकार (Skin diseases) : कल्केरिया फ्लोर ६x, कल्केरिया सल्फ ३x, काली सल्फ ३x, नेट्रम मूर ३x, नेट्रम सल्फ ३x
२१. दंत विकार (Teething troubles) : कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x
२२. गंडमाळा (गळ्यातील लसिका ग्रंथींचा क्षयरोग) (Scrofula) : कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x, काली मूर ३x, सिलिशिया ६x
२३. दात येतांना होणार्या वेदना (Teething pain) : कल्केरिया फॉस ३x, मॅग फॉस ३x, फेरम फॉस ३x
२४. टॉनिक (Nerve and brain tonic) : कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x, काली फॉस ३x, मॅग फॉस ३x, नेट्रम फॉस ३x
२५. अपचन, पित्त आणि गॅस (Indigestion, Acidity and Flatulence) : मॅग फॉस ३x, नेट्रम फॉस ३x
२६. सुलभ प्रसुती (Easy birth) : कल्केरिया फ्लोर ६x, फेरम फॉस ३x, काली फॉस ३x, मॅग फॉस ३x
२७. शक्तीवर्धक (Strength and Vigor) : कल्केरिया फ्लोर ३x, फेरम फॉस ३x, काली फॉस ३x, नेट्रम मूर ६x, नेट्रम फॉस ३x
२८. टॉनिक (शक्तीवर्धक) (General Tonic) : कल्केरिया फ्लोर ३x, कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x, काली मूर ३x, काली फॉस ३x, काली सल्फ ३x, मॅग फॉस ३x, नेट्रम मूर ६x, नेट्रम फॉस ३x, नेट्रम सल्फ ३x, सिलिशिया ६x
औषधाचे प्रमाण आणि वेळा
मोठ्या व्यक्तींना दिवसातून ३ ते ४ वेळा ३ ते ५ गोळ्या द्याव्यात, तर लहान मुलांना २ ते ३ गोळ्या, तसेच नवजात बालकांना १ गोळी द्यावी.’ (टीप : वरील औषधे वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.)
संकलक : होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, पुणे (१३.४.२०२५)
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
क्रिकेटचा उदो उदो नको !