‘१०.७.२०२५ या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कोल्हापूर येथील साधकांना मार्गदर्शन केले. तेव्हा साधकांना त्यांच्याविषयी आणि गुरुपौर्णिमेच्या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. श्री. संजय मोहन जगदाळे
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आल्यावर साक्षात् श्री महालक्ष्मीदेवी आली आणि तिचे दर्शन झाले’, असे मला वाटले.
२. सौ. नम्रता जगदाळे
अ. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे मार्गदर्शन ऐकतांना आनंद मिळाला आणि ‘मार्गदर्शन संपू नये’, असे वाटले.
आ. त्यांनी माझ्या गालावरून हात फिरवला. तेव्हा त्यांचा स्पर्श मऊ कापसासारखा वाटला. ‘माझी आई माझ्यावर मायेने हात फिरवत आहे’, असे मला वाटले.
३. सौ. विद्या भोईटे, राजारामपुरी
अ. गुरुपौर्णिमेसाठी मी सकाळीच सभागृहात पोचले. गुरुपूजनापूर्वी मला मानसपूजा करण्यास सांगितली. मी प्रार्थना केल्यावर मला सनातनचे तिन्ही गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) गुरुपूजनाच्या स्थळाकडे जातांना दिसले. मला सूक्ष्मातून त्यांच्या पावलांचा आवाज ऐकू आला.
आ. गुरुपूजनासाठी ठेवलेल्या प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्रामध्ये मला कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे दर्शन झाले.
इ. माझ्याकडून भावपूर्ण आरती होऊन आरतीच्या भावार्थाप्रमाणे कृती झाली.
४. सौ. रूपा पाटील
अ. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव झाल्यानंतर ‘मला सनातनच्या तिन्ही गुरूंना जवळून पहाता यावे’, असे मला वाटत होते. त्यासाठी मी गुरुदेवांना प्रार्थना करत असे. एकदा गुरुमाऊली सूक्ष्मातून मला म्हणाली, ‘तू दायित्व घेऊन सेवा कर. आम्ही भेटायला येऊ.’ या वर्षी गुरुपौर्णिमेला पहिल्यांदाच मला स्वागतकक्षाचे दायित्व मिळाले. मी सेवा करत असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पाहिले. त्यांच्याकडून मला चैतन्य मिळाले. तेव्हा माझे भावाश्रू थांबत नव्हते.’
आ. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ सभागृहातून बाहेर जातांना त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘प्रत्यक्षात आम्ही तुमचे स्वागत करायला पाहिजे. तुम्ही छान सेवा करत आहात. इथून पुढे व्यष्टी संदर्भात नकारात्मक विचार मनात आणायचे नाहीत.’’ ‘माझ्या मनात नेहमी विनाकारण नकारात्मक विचार येत असतात’, त्यासाठी त्या असे म्हणाल्याचे मला जाणवले.’
५. सौ. माधुरी कुलकर्णी
अ. ‘गुरुपौर्णिमेच्या आधी २ दिवस मला श्री गुरूंचे स्मरण होऊन माझी भावजागृती होत होती. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्यक्ष पूजन चालू झाल्यावर ‘मी स्वतः सूक्ष्मातून पूजन करत आहे आणि सनातनचे तिन्ही गुरु व्यासपिठावर उपस्थित आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा माझ्या आज्ञाचक्रामधून चैतन्याचा प्रकाश शरिरामध्ये जात होता.
आ. ‘गुरुपूजन झाल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ श्री गुरूंना ओवाळत आहेत’, असे मला दिसत होते. तेव्हा माझी भावजागृती होत होती.
इ. जेव्हा मला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे दर्शन झाले, तेव्हा ‘मी कुठे आहे ?’ हे माझ्या लक्षात येत नव्हते. माझी भावजागृती झाली. त्यांचे अमूल्य मार्गदर्शन ऐकतांना ‘त्यांच्या ओघवत्या वाणीतील शब्द माझ्या हृदयापर्यंत जात आहेत’, असे मला वाटले.’
६. श्री. संकेत कुलकर्णी
अ. ‘गुरुपूजन चालू असतांना मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘मी काय अर्पण करू ?’ तेव्हा गुरुदेवांनी मला ‘माझे मन’ अर्पण करण्यास सांगितले. त्यानंतर मला ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे पूजन प.पू. गुरुदेव करत आहेत’, असे दिसले. थोड्या वेळाने ‘प.पू. गुरुदेवांचे पूजन प.पू. भक्तराज महाराज करत आहेत’, असे दिसले. त्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘गुरुतत्त्व एकच असून प.पू. बाबा आणि प.पू. गुरुदेव दोघेही एकच आहेत.’
आ. जेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन झाले, तेव्हा ‘त्यांच्या रूपात साक्षात् प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर आले आहेत’, असे मला वाटले.
इ. ‘मला त्यांचे मार्गदर्शन एकदा तरी ऐकायला मिळावे’ ही माझी इच्छा देवाने पूर्ण केली. मार्गदर्शन ऐकतांना मला आनंद झाला.
७. श्री. किरण दुसे, कोल्हापूर
अ. सकाळी व्यासपिठावर गुरुपूजन चालू असतांना ‘प्रत्यक्ष गुरूंचेच पूजन होत आहे’, असे मला जाणवत होते. तेव्हा ‘माझे मन अतिशय शांत आणि निर्विचार झाले आहे’, असे वाटत होते.
आ. दुपारी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ व्यासपिठावर आल्यावर माझी भावजागृती झाली.
इ. प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुष्कळ पाऊस पडत असतो. त्यामुळे कार्यक्रमासाठी बाहेर गावांहून येणार्यांना अडचणी येतात. या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पाऊस पडला नाही. त्यामुळे बाहेरगावचे अनेक जण निर्विघ्नपणे कार्यक्रमासाठी येऊ शकले. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी कार्यक्रमातील अडथळे दूर केले’, असे मला वाटले.
(सर्व सूत्रांचा दिनांक (१७.७.२०२५)
| सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !