‘ChatGPT’ In India : ‘चॅटजीपीटी’चे आस्थापन ‘ओपन एआय’ने भारतात उघडले कार्यालय !

नवी देहली – ‘चॅट जीपीटी’ हे जगप्रसिद्ध ‘एआय टूल’ (कृत्रिम बुद्धीमत्तेची प्रणाली) बनवणारे आस्थापन ‘ओपन एआय’ने भारतात त्याचे कार्यालय चालू केले आहे. आस्थापनाने राजधानीतच तिचे पहिले कार्यालय उघडले आसून त्यासाठी कर्मचार्‍यांची भरतीसुद्धा आरंभली आहे. ओपनएआय भारतात त्याचे पाय रोवण्याची सिद्धता करत आहे.