
कोल्हापूर, २२ ऑगस्ट (वार्ता.) – कोल्हापूर शहरात अनेक रस्ते खड्डेमय आणि धोकादायक झाले आहेत, तरी याच्या निषेधार्थ अखिल भारत हिंदु महासभा पक्ष यांच्या वतीने खड्डे असलेल्या रस्त्यांमध्ये झाडे लावून खड्ड्यांच्या आजूबाजूला रांगोळी काढून, तसेच फुले टाकून वेगळ्याप्रकारे आंदोलन करण्यात आले. खड्ड्यांमुळे नागरिकांचे अपघात, नागरिकांचे मृत्यू होत आहेत, आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत, तरी संबंधित ठेकेदार आणि उत्तरदायी अधिकारी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली.

या प्रसंगी राजेंद्र तोरस्कर, विकास जाधव, नंदू घोरपडे, अजय सोनवणे, महिंद्र अहिरे, बबन खोपकर, सुनील सामंत, मनोहर सोरप, गजानन तोडकर, अभिजित पाटील, महिला आघाडीच्या शिलाताई माने, रेश्मा साळुंखे, डॉ. अश्विनी माळकर यांसह अन्य उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण !
आद्यगोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते अनावरण !
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !