आज तिथीनुसार ‘स्वातंत्र्यदिन’ आहे. त्या निमित्ताने…


स्वातंत्र्यदिन सोहळा
देशाच्या परमभाग्याचा ।
शतकांच्या अभिलाषेने
दिन गवसला अमृताचा ।। १ ।।
भेदाभेद आपसांतला
हा शाप जन्मजन्मांतरीचा ।
उद्धार जसा पदस्पर्शाने
दिन गवसला मुक्ततेचा ।। २ ।।
युगे युगे महती गातो
मेरुमणी हा विश्वाचा ।
एक दिलाने आज प्रार्थूया
दिन गवसेल अखंडतेचा ।। ३ ।।
इशारा साधकांचा !
स्वातंत्र्यदिन आज देशाचा
भारतियांच्या पक्क्या इराद्यांचा ।
देशास या तोडू पहाणार्यांनो
देतो इशारा हा निर्वाणीचा ।। १ ।।
शतकांच्या दुहीच्या कलहाने
देश अंतरबाह्य पोखरला ।
अभेद्य एकतेस फोडू पहाणार्यांनो
ठेचू त्या दुहीच्या संसर्गाला ।। २ ।।
ठेवा आमच्या उच्च संस्कृतीचा
जगी तोड नाही महानतेला ।
उज्ज्वल भविष्यासाठी साधकांनो
बनू चिरा तिच्या तटबंदीचा ।। ३ ।।
– श्री. महेश पारकर, शिरोडा, गोवा. (१४.८.२०२५)
जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !