
‘१२.५.२०२५ या दिवशी मी आणि यजमान (श्री. अजित गोखले, वय ७२ वर्षे) देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. आम्ही अनुमाने सकाळी ११ वाजता नामजप करण्यासाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी पूर्वी वास्तव्य केलेल्या खोलीत बसलो होतो. खोलीतील शांत वातावरणात माझा नामजप चांगला होत होता. मी नामजप करत असतांना अकस्मात् माझ्या डोळ्यांसमोर भगवान परशुराम यांचे चित्र आले आणि त्या चित्रात मला भगवान परशुराम यांचे दर्शन झाले. तेव्हा मला एका अभंगातील ‘माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साऊली ।’ ही ओळ आठवली आणि माझी भावजागृती झाली. मला पुष्कळ आनंद झाला.
पुढील सप्ताहात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ होणार होता; मात्र ‘काही अडचणींमुळे मला तेथे जाणे शक्य नव्हते; म्हणून आश्रमातच भगवान परशुराम यांचे दर्शन झाले असावे’, असे मला वाटले.
ही सर्व सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा आहे.’
– सौ. योगिता अजित गोखले (वय ६३ वर्षे), गोवळ, तालुका राजापूर, (जिल्हा रत्नागिरी). (२६.६.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।