पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये समाजातील काही मान्यवर वक्ते उपस्थित होते. त्यांनी सनातन संस्था आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् सनातनचे साधक यांच्याविषयी अनेक गौरवोद्गार काढले. काही मान्यवर वक्त्यांची भावजागृतीही झाली. त्याविषयी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत. १८.८.२०२५ या दिवशी यातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहू.

४. श्री. दिलीप देशमुख (माजी धर्मादाय आयुक्त), तळेगाव
अ. श्री. दिलीप देशमुख यांच्याशी अनौपचारिक चर्चा करतांना संस्था आणि साधक यांविषयी त्यांनी अनेक गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, ‘‘माझ्यात ‘राग येणे’ हा अतिशय मोठा स्वभावदोष आहे. ‘तुम्ही सगळे साधक इतके व्यवस्थितपणे, शिस्तबद्ध आणि नम्रतेने कसे बोलता ?’, असा मला प्रश्न पडतो. आश्रमात गेल्यानंतर मला गुरुदेवांना भेटण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांनासुद्धा मी हेच विचारले. त्यांनी मला स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेविषयी जाणून घेण्यास सांगितले. ‘मनावर नियंत्रण कसे ठेवायचे ?’ याविषयी मला प्रयत्न करायचे आहेत. ‘आश्रमातील लहान मुलेसुद्धा तितकीच प्रगल्भ आहेत’, हे पाहून मला असे वाटले की, माझे आयुष्य आणि माझा अनुभव या सर्वच गोष्टी त्यांच्यासमोर व्यर्थ आहेत. जे तुम्हाला सर्वांना तरुण वयात जमले, ते मला अजूनही जमले नाही.’’
आ. ‘शंखनाद महोत्सवा’ची ध्वनीचित्रफीत (व्हिडिओ) पाहून ते म्हणाले, ‘‘मला तिथे जाता आले नाही; पण ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून मला आज महोत्सव अनुभवता आला. तिथे जाऊन कदाचित् मला हे सगळे पहाता आले नसते; पण आज संपूर्ण महोत्सव पाहिला. सनातन संस्था पुष्कळ मोठे कार्य करत आहे. मीच वेळ देण्यास न्यून पडतो; पण मला जसे जमेल, तसे मी प्रयत्न करणार आहे, म्हणजे माझा या कार्यात थोडा सहभाग होईल.’’
५. सौ. उज्ज्वला गौड (सरचिटणीस, भाजप महिला मोर्चा), सिंहगड रस्ता
५ अ. सौ. उज्ज्वला गौड यांनी ‘गुरुदेवांनी मला पुन्हा मनुष्यजन्मात आणले, तर केवळ त्यांची सेवा करण्यासाठीच आणावे अन्यथा पुनरपी संसारात येणे नाही !’, अशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करणे : व्यासपिठावर गेल्यानंतर मार्गदर्शन आरंभ करण्याआधी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) स्मरणाने सौ. उज्ज्वला गौड यांच्या डोळ्यांतून अखंड भावाश्रू येत होते. ‘कुणाला त्याची आई भेटावी’, त्याप्रमाणे त्यांना गुरुमाऊलीची आठवण येत होती. त्या म्हणाल्या, ‘‘अनंत जन्मांच्या पुण्याईमुळे मला गुरुदेवांच्या चरणांवर नतमस्तक होण्याचे भाग्य लाभले. हे माझ्या आयुष्यातील दिव्य क्षण होते. माझे आयुष्य तेव्हापासून पालटून गेले आहे. ‘गुरुदेवांनी मला पुन्हा मनुष्य जन्मात आणले, तर केवळ त्यांची सेवा करण्यासाठीच आणावे अन्यथा पुनरपी संसारात येणे नाही ! (मला पुन्हा या संसारात यायचे नाही.)’, अशीच माझी त्यांच्या चरणी मागणी (प्रार्थना) असेल. या कलियुगामध्ये धर्माचे अधिष्ठान असलेल्या गुरुदेवांनी आपल्या सर्वांना एकत्र गुंफले आहे.
५ आ. सौ. उज्ज्वला गौड यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव : आई जशी आपल्या लेकराची काळजी घेते, त्याप्रमाणे गुरुदेव साधकांची काळजी घेत आहेत. हारातील दोर्यामुळेच सर्व फुले एकत्र असतात. हारामध्ये गुंफलेला दोरा दिसत नाही, त्याप्रमाणे गुरुदेवांचे साधकांच्या जीवनातील अस्तित्व दिसत नाही. गुरुदेवांच्या चरणांची सेवा करण्यासाठीच देवाने मला पुन्हा जन्माला आणावे. ‘गुरुदेवांचे स्मरण होताच ‘डोळ्यांतील अश्रू आणि हृदय त्यांच्याजवळ गेलेले असते’, असा भाव माझ्या अंतरी निर्माण होतो. ज्या व्यक्तीची साधना नसेल, ज्यांना सनातन धर्म ठाऊक नसेल, अशांसाठी येणारा काळ अडचणींचा आहे. ‘प्रत्येकाने सेवारत कसे रहावे ? कोणती साधना आणि सेवा करावी ?’ याचे मार्गदर्शन सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संस्थापक गुरुदेव करत आहेत. ‘जेव्हा गुरूंनी हात धरलेला असतो, त्या वेळी मनुष्य भरकटू शकत नाही’ आणि हीच गुरुदेवांनी दिलेली शिदोरी आहे’, त्यांनी दिलेली ही शिकवण आहे. ‘येणार्या काळात साधना का आवश्यक आहे ?’ याचे मार्गदर्शन सनातन संस्था विनामूल्य करत आहे; मात्र ‘जे विनामूल्य मिळते, ते वाया घालवू नये’, हे प्रत्येकाचे दायित्व आहे. कलियुगात कृतयुगाची जाणीव करून देणारेही गुरुदेवच आहेत. त्यामुळे त्यांची शिकवण, त्यांचे विचार प्रत्येकाने शक्य तेवढे ग्रहण करावेत. गुरुदेवांच्या चरणी एकच मागणी (प्रार्थना) आहे, ‘आमची पुढची पिढी त्यांच्या चरणांशी असावी. साधना आणि सेवा यांमध्ये असावी.’
५ इ. सौ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी दिलेला संदेश भावपूर्णपणे आणि हात जोडून ऐकतांना ‘गुरुदेवांनी आपल्यासाठी पाठवलेला हा अनमोल संदेश आहे’, असा भाव असणार्या सौ. उज्ज्वला गौड ! : सौ. उज्ज्वला गौड गुरुपौर्णिमा महोत्सवातील सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी दिलेला संदेश भावपूर्णपणे आणि हात जोडून ऐकत होत्या. ‘गुरुदेवांनी आपल्यासाठी पाठवलेला हा अनमोल संदेश आहे’, असा त्यांचा भाव होता. प्रत्यक्षात त्यांचे नियोजन पुष्कळ व्यस्त असूनही त्यांची कार्यक्रमाला येण्याची तळमळ होती. त्यांना शक्य तेवढा वेळ त्या सहभागी झाल्या. यांच्याशी अनौपचारिक बोलतांना त्या म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांना पाहिल्यापासून, त्यांचे नाव उच्चारले, तरी माझी भावजागृती होत आहे. मी अतिशय भाग्यवान आहे, मला सेवेची संधी मिळाली.’’
६. श्री. विवेक सिन्नरकर (लेखक आणि कीर्तनकार), सातारा रस्ता
अ. ‘श्री. विवेक सिन्नरकर हे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचल्यानंतर सभागृहामध्ये जात असतांना श्री. विलास पाटीलकाका त्यांना संपूर्ण ग्रंथप्रदर्शन दाखवत होते. तेव्हा त्यांनी प्रत्येक कक्षावरील साधकांशी बोलून त्यांच्याकडून त्या कक्षाविषयी आणि संस्कार वह्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊन ‘‘या वह्या कुठे मिळतील ?’’ हे जाणून घेतले. त्यांनी ‘‘मी यापूर्वीही सनातनचे काही ग्रंथ घेतले आहेत’’, असे आम्हाला सांगितले. त्यानंतर त्यांनी गुरुदेवांनी केलेली संस्थेची स्थापना, संस्थेचे कार्य आणि ग्रंथनिर्मिती यांविषयी गौरवोद्गार काढले. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या मनामध्ये गुरुदेवांविषयी आदर आणि श्रद्धा जाणवली.
आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदूंचे संघटन आणि धर्मशिक्षण यांवर फार मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्र घेऊन हिंदु राष्ट्राच्या दिशेने अतिशय महत्त्वाचे कार्य केले आहे.
इ. ‘वक्त्यांच्या कक्षामध्ये त्यांच्याशी अनौपचारिक संवाद साधत असतांना ते म्हणाले, ‘‘मी लिहिलेल्या ‘गीता विवेक’ या ग्रंथाला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे आशीर्वाद लाभले आहेत, हे माझे भाग्य आहे.’’ (समाप्त)
संकलक : पू. (सौ.) मनीषा पाठक, पुणे (१३.७.२०२५)
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !