
युगोस्लाव्हियाचा अध्यक्ष मेला, तेव्हा जगातील ‘सर्वांत श्रीमंत कम्युनिस्ट (साम्यवादी) मेला’, असे लेख प्रसिद्ध झाले होते. साम्यवादाचे याहून अधिक विडंबन कोणते ? समतेच्या गप्पा मारणे सोपे आहे. समता प्रस्थापित करण्यासाठी निःस्वार्थ भूमिका स्वीकारावी लागते. तिची सावलीही कुठे दिसत नाही. चपराशापासून बँकेतील मोठ्या अधिकार्यापर्यंत आणि प्राथमिक शिक्षकापासून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींपर्यंत सगळेच वेतनवाढीसाठी संपावर जात असतात. लोकसभेत आणि विधानसभेत सदस्यांची वेतनवाढ करण्याच्या प्रकरणात सगळे पक्ष एकमताने मान्यता देतात, हे सगळे समाजाच्या कल्याणासाठी चालले आहे, असे म्हणता येईल काय ? परंपरेच्या विषमतेला नावे ठेवतांना आपल्या पायाखाली काय जळते आहे, हे कुणी पहात नाही. सर्व प्रकारची सत्ता हाती असल्यामुळे स्वतः वाटेल तसे वागून प्रचारमाध्यमाच्या बळावर लोकांची दिशाभूल करता येते. मंत्र्याचे निवासस्थान दुसर्या मंत्र्याला मिळाले की, त्यात स्वतःच्या इच्छेप्रमाणे सुधारणा करण्यासाठी तो मंत्री ५-१० लाख रुपये व्यय करतो. ते शासनाचे म्हणजे सामान्यजनांचेच असतात ना ? बहुसंख्य समाज दारिद्र्यरेषेखाली रहातो, असे असतांना मंत्री ही चैन करतो आणि वर स्वतःला ‘समतेचा पुरस्कर्ता’, असे म्हणतो. या वस्तूस्थितीला निर्लज्जपणाच्या व्यतिरिक्त दुसरे काय नाव द्यावयाचे ?
साम्यवाद म्हणजे केविलवाणी शोकांतिका !
‘साम्यवादाचा हा प्रयोग आमच्या देशात झाला, ही आम्हा लोकांची एक केविलवाणी शोकांतिका आहे’, असे उद्गार रशियाचे मिखाईल गोर्बाचेव्ह आणि बोरिस येल्तसिन यांनी काढले. विषमता ही नष्ट होणारी वस्तू नाही, हेच या घटनेने सिद्ध केले आहे. विषमता स्वीकारणे जर अपरिहार्यच असेल, तर उद्योग व्यवसायाचे विकेंद्रीकरण करणारी वर्णव्यवस्था स्वीकारणेच उपयुक्त ठरते. ती मुळात जन्माधिष्ठित आहे; म्हणूनच केवळ त्याज्य मानणे इष्ट नाही. संपूर्ण समता असलेला समाज निर्माण करण्यासाठी साम्यवादी विचारसरणी स्वीकारली गेली. त्यासाठी क्रांती घडवून साम्यवाद्यांनी सर्व शासन आपल्या पद्धतीप्रमाणे निरंकुशपणे चालवले. शासनाचे निष्ठुर आदेश न मानणार्यांचे निर्घृणपणे शिरकाण केले.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘मनुस्मृती भूमिका’ आणि ‘पूर्वरंग तरंगिणी’ या ग्रंथातून )
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !