लेख क्र. १८

‘एकदा माझ्या वाचनात एक लेख आला होता. एखाद्या आर्थिक किंवा शारीरिक बलवान व्यक्तीने बलहीन व्यक्तीवर अन्याय केल्यास बलहीन व्यक्तीला काही करता येत नाही. तेव्हा बलहीन व्यक्तीची पुष्कळ चिडचिड होते. तिच्या मनात ‘बलवान व्यक्तीला मारावे’, असे वाईट विचार येऊन तिला ताण येतो. या समस्येवर संशोधकांनी एक प्रयोग केला. त्यामध्ये बलहीन व्यक्तीला बलवान व्यक्तीच्या पश्चात् मोठ्याने शिव्या देण्यास सांगितले. त्यानंतर शिव्या देणार्या बलहीन व्यक्तीची वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा तिचा रक्तदाब आणि ताण न्यून झाल्याचे दिसून आले. या प्रयोगावरून संशोधकांनी म्हटले होते, ‘आपल्या मनावरचा ताण आणि चिडचिडेपणा न्यून करण्यासाठी ‘शिव्या देणे’ हा एक चांगला मार्ग आहे.’
या प्रयोगाविषयी मी पूर्वी एकदा प.पू. गुरुमाऊलींना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तामसिक वृत्तीच्या संशोधकांनी हा तामसिक प्रयोग केला आहे. तो योग्य नाही. ताण घालवण्यासाठी तुम्ही नामजप आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करू शकता.’’
– डॉ. दीपक जोशी (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स) देवद, पनवेल. (२१.०२.२०२५)
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !