मंदिर महासंघ आणि ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ यांच्या वतीने बैठक

निगडी (पुणे), १० ऑगस्ट (वार्ता.) – लवकरच येणार्या गणेशोत्सवानिमित्त हिंदूंना ‘धर्मशिक्षण’ मिळावे, यासाठी गणेशोत्सव मंडळांनी, तसेच मंदिराच्या विश्वस्तांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज यांनी केले. ते निगडी येथील चिंतामणी मंदिर येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ सेवेची पुढील दिशा ठरवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्यावतीने मंदिर विश्वस्त, मंडळांचे पदाधिकारी आणि धर्माभिमानी यांच्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराजे पुढे म्हणाले की, हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे दैनंदिन उपासना, सण, उत्सव, व्रत इत्यादी कसे साजरे करावेत ? हे त्यांना ज्ञात नाही; म्हणून मंडळाचे पदाधिकारी, मंदिराचे विश्वस्त यांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि फ्लेक्सद्वारे, धर्मशिक्षणवर्गाद्वारे हिंदूंना धर्मशिक्षण मिळेल, अशी सोय मंदिरांमध्ये, मंडळांमध्ये उपलब्ध करून द्यावी. ‘या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद लाभला आणि ११ हून अधिक उत्सव प्रमुखांनी उत्स्फूर्तपणे स्वत:च्या नावाची नोंद ‘फ्लेक्स उपलब्ध करून द्यावेत’, यासाठी दिली.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. सचिन घुले यांनी हिंदूसंघटनाची आवश्यकता आणि त्यासाठी पुढील उपक्रमाची दिशा या विषयावर स्वत:चे मत व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी ‘आगामी गणेशोत्सव हा हिंदु धर्मशास्त्रानुसारच साजरा करा’, असे आवाहन केले. या बैठकीला ३५ हून अधिक मंदिर विश्वस्त, तसेच मंडळाच्या पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
या बैठकीला श्री चिंतामणी मंदिराचे अध्यक्ष श्री. शशांक शहाणे, कार्यवाहक श्री. किशोर दीक्षित, खजिनदार सर्वश्री महेश देखणे, विवेक चोभे, राजेंद्र पाटील, संस्कृती संवर्धन आणि विकासाचे श्री. रविकांत कळंबकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !