‘सनातनी आतंकवाद’ म्हटल्याचे प्रकरण

कराड, ४ ऑगस्ट (वार्ता.) – मालेगाव बाँबस्फोटाच्या निकालानंतर केलेल्या वादग्रस्त विधानावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेच्या युवा सेना शाखेने शहरातील दत्त चौकात निषेध आंदोलन केले.
जिल्हा विद्यार्थी सेना प्रमुख संभाजी पाटील आणि जिल्हा संघटक राजू केंजळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ‘सनातनी आतंकवाद’ असा उल्लेख करून चव्हाण यांनी भगव्या विचारसरणीचा अपमान केला आहे. हिंदुत्व हा आमचा अभिमान असून त्याविरुद्ध कुणीही अपमानास्पद विधान केल्यास त्याचा तीव्र निषेध केला जाईल. आता आम्ही शांततेत आंदोलन केले असले, तरी हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. संबंधितांना ‘शिवसेनेच्या पद्धती’ने उत्तर देण्यात येईल. या वेळी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेत ‘सनातन हिंदु धर्माचा विजय असो’, ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’, ‘हिंदुत्व आमचा अभिमान’ इत्यादी घोषणा दिल्या.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा