हीच वेळ आहे भारतीय काँग्रेस पक्ष नेस्तनाबूत करण्याची आणि बुडवण्याची !

मालेगाव बाँबस्फोट प्रकरण

सत्य कटू असते; पण हे समजायला वेळ पुष्कळ लागतो. मुसलमानांच्या तुष्टीकरणापोटी हिंदूंना जेवढे म्हणून ठेचता येईल, तेवढे ठेचण्याचे महत्पाप काँग्रेस पक्षाने केले आहे. ‘भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत ?’, यावर मतभेद असतील; पण ‘पाकिस्तानचा बाप काँग्रेसच आहे’, यात दुमत असायचे कारण नाही. मुसलमानांना स्वतंत्र राष्ट्र हवे होते, तेही देशास स्वातंत्र्य मिळत असतांना. त्या वेळी स्वतंत्र देश मागणार्‍यांच्या मनात पाप होते आणि तसे ते पाप असा स्वतंत्र देश देणार्‍यांच्या मनातही होते. नुसता स्वतंत्र देश दिला नाही, प्रदेश दिला नाही, वर पैसे दिले. यात आमच्या सहस्रो लाखो हिंदु बंधू-भगिनींच्या देहाची विटंबना झाली. अनेकांना सक्तीचे धर्मांतर करावे लागले. पाकिस्तान प्रांतातील स्वतःच्या मालमत्ता सोडून द्याव्या लागल्या, हाल हाल झाले; पण त्याचे दुःख काँग्रेसला कधी झाल्याचे दिसून आले नाही. एवढ्याने मुसलमानांची भूक भागली नाही. या भुकेला सातत्याने शांत करण्याचे कार्य काँग्रेस पक्षाकडून घडलेले आहे, हे नाकारता येणार नाही. अर्थात् ही भूक म्हणजे आग आहे. ती शांत होणारी नाही. मुसलमानेतर समाजाला भस्मसात् केल्याविना ती थांबायची नाही. असेच काहीसे त्यांचे धोरण आहे, असे म्हटले, तर फार मोठी चूक होणार नाही. या धोरणाला आकार देण्याचे आणि खतपाणी घालण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे, हे इतिहासाच्या पानापानांतून दिसून येईल. त्यासाठी डोळे उघडे आणि विचार स्पष्ट हवे आहेत. पंडित नथुराम गोडसे यांनी जे कार्य केले, त्यामुळे काँग्रेसच्या धोरणासाठी गतीरोधक निर्माण झाला, असे म्हटले, तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. असो.

१. मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी खोट्या कथानकाचे सूत्रधार काँग्रेसच !

‘मालेगाव येथील बाँबस्फोटात हिंदूंचा सहभाग आहे’, अशा प्रकारची कथा रचली गेली. त्यात साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह अनेक हिंदूंना आरोपी केले गेले. त्यांचे अतोनात छळ केले गेले. त्याचा नुसता तपशील जरी नजरेखालून घातला, तरी थरकाप उडावा, असा तो छळ होता. या सर्व आरोपींनी हा सगळा छळ सहन केला, तो केवळ आपल्या हिंदु धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांसाठी. ही सारी मंडळी जवळजवळ १७ वर्षांनंतर निर्दोष सुटली. आयुष्यातील उमेदीची वर्षे त्यांना मानहानीखाली घालावी लागली. ही मानहानी त्यांनी सहन केली. या मानहानीचा सूत्रधार आणि कर्ता करविता हा काँग्रेस पक्ष होता, हे स्वतंत्रपणे सांगायची आवश्यकता नाही.

२. काँग्रेसची चुकीची भूमिका

आपल्याच देशात हिंदु असुरक्षित कसा राहील आणि मुसलमानांना फावेल कसे ?, याचे काँग्रेसने अधिकाधिक नियोजन केले. त्याची सूची वाचायची म्हटले, तर दमछाक होईल एवढी ती मोठी आहे. आम्ही पंडित नथुराम गोडसे यांच्यावर प्रेम करायला लागलो, त्याचे कारणच मुळी काँग्रेसच्या या भूमिकेत आहे. गोडसे योग्य कि अयोग्य ? यापेक्षा काँग्रेस सर्वाधिक बदमाश आहे. यामुळेच आम्हाला पंडित नथुराम गोडसे यांच्यावर प्रेम करणे भाग पडले, असे म्हटले, तर त्यात दोष कुणाचा ?

श्री. श्रीनिवास वैद्य

३. देशविरोधी कारवायांमध्ये धर्मांध मुसलमानांचा वाढता सहभाग

सर्व राष्ट्रविरोधी आणि राष्ट्रद्रोही घटनांमध्ये आरोपींची नावे मुसलमानांची असतात, हे उघड सत्य आहे. भारतविरोधी कारवायांमध्ये सर्वाधिक सक्रीय मुसलमान समाज आहे, हेही सत्य आहे. अर्थात् असे म्हणत असतांना ‘संपूर्ण मुसलमान समाजास दोष देण्याचे कारण नाही’, हे जितके खरे आहे, तितकेच ‘मुसलमान समाज हिंदु आणि हिंदु राष्ट्र विरोधी आहेत’, हेही तेवढेच निखळ सत्य आहे. तो अनेक मार्गांनी हिंदु धर्म, संस्कृती तथा समाज यांवर आक्रमण करत आलेला आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, काँग्रेस याला कधीच विरोध करू शकलेली नाही.

४. काँग्रेसच्या ‘हिंदु आतंकवाद’ भूमिकेचे हेमंत करकरे पाठीराखे !

‘मालेगाव बाँबस्फोटामागे हिंदु आहेत’, याची कथा रंगवण्याचे दायित्व हेमंत करकरे यांच्याकडे होते. हेमंत करकरे हे आतंकवादीविरोधी पथकाचे मुख्याधिकारी होते. मालेगाव बाँबस्फोटाच्या अन्वेषणाचे उत्तरदायित्व त्यांच्यावर होते. काँग्रेसच्या ‘हिंदु आतंकवाद’ या भूमिकेचे ते पाठीराखे होते, असे म्हटले तर चुकले काय ? ते असे का वागले, यावर आता विचार करण्यात अर्थ नाही. खोट्या भूमिकेची पाठराखण केल्याकारणाने त्यांना शिक्षा मिळाली आहे, असे जर कुणाचे मत असेल, तर ते चुकीचे का समजावे ? नियतीने तिचा हिशोब केला आहे, असे का म्हणू नये ?

५. निवृत्त पोलीस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी उघड केलेले सत्य

येथे एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते. या स्फोटाच्या अन्वेषणातील एक व्यक्ती सोलापुरातील होती. भले जन्माने ती मुसलमान होती; पण ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या काँग्रेस भूमिकेशी त्यांचे कधीच जमले नाही. याचा त्यांना आयुष्यभर पुष्कळ त्रास झाला. या अन्वेषणाच्या वेळी त्यांच्या जे जे काही दृष्टीत आले, ते ते त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे सांगितले होते. ‘साध्वी प्रज्ञासिंह आणि त्यांचे सहकारी यांचा या बाँबस्फोटाशी संबंध नाही’, या विचाराशी ते प्रामाणिक होते. कधीकाळी त्यांच्याशी बोलतांना हे प्रकर्षाने जाणवायचे आणि आम्हाला त्यांचे कौतुक करावे, असे वाटायचे. हे अधिकारी, म्हणजे निवृत्त पोलीस अधिकारी मेहबूब मुजावर. मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर मी त्यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदन केले.

६. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी ‘हिंदु आतंकवाद’ विचारास खतपाणी घातले !

काय योगायोग आहे पहा. सोलापूरमधीलच काँग्रेसच्या गांधी घराण्याशी एकनिष्ठ असणार्‍या व्यक्तीने, म्हणजेच सुशीलकुमार शिंदे यांनी ‘हिंदु आतंकवाद’ या विचारास खतपाणी घातले होते. हे खरे आहे कि नाही ? खरे तर काँग्रेसचा स्वातंत्र्याचा लढा हा भारतमातेसाठी होता, हिंदु राष्ट्रासाठी होता, सहस्रो वर्षांची परंपरा असणार्‍या या भूमीसाठी होता; पण स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतची त्यांची सारी हयात ही मुसलमानांच्या तुष्टीकरणात गेली आहे. मुसलमानांचे एकगठ्ठा मतदान हे त्यांचे लोकशाहीतील सर्वांत मोठे भांडवल राहिलेले आहे.

७. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी केलेले वक्तव्य म्हणजे फार मोठी चूक !

पुढील योगायोग पहा. सुशीलकुमार शिंदे यांच्या मुलीने, म्हणजेच सोलापूरच्या सध्याच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी नुकतेच लोकसभेत भाषण केले. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टीका करावी, या त्यांच्या अधिकाराविषयी कुणाचे दुमत नाही; पण आपल्या देशाच्या सैनिकांनी जो पराक्रम केला आहे, त्यावर भाष्य करत असतांना ‘तमाशा’ हा शब्द वापरून त्यांनी फार मोठी चूक केलेली आहे, यात शंका बाळगायचे कारण नाही. मी स्वतः काही माजी सैनिकांकडून ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी जाणून घेतले. अत्यंत धाडसी, अचूक आणि अप्रतिम अशी ती कामगिरी आहे, असेच त्यांचे मत आहे. कोणतीही भाषा लवचिक असते. उत्तरदायित्व असलेल्या माणसांनी ती दायित्वाने वापरायची असते, हे विसरून चालणार नाही.

८. गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष भारतीय लोकशाहीच्या राजकीय पटलावरून काढणेच महत्त्वाचे !

सध्याची काँग्रेस ही नेहरू-गांधींची आहे. यातील गांधी हे नाव फसवे आहे. या नावाचा म. गांधी यांच्याशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही; पण गांधी आडनावाचा आधार घेत तमाम देशवासियांचे बुद्धीभेद करण्याचे मोठे पाप काँग्रेसने केले आहे. हा मोठा खेळ गेली ६० वर्षे चालू आहे. लोकशाहीत कुणी कोणत्या पक्षात असावे, याविषयी भाष्य करण्याचा आम्हाला अधिकार नाही; मात्र जो पक्ष राष्ट्रविरोधी आहे आणि हे काळाच्या कसोटीवर दिवसागणिक सिद्ध होत आले आहे, त्या राजकीय पक्षाच्या सावलीलाही कुणी उभे राहू नये, असे सांगायची वेळ आलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा राजकीय पक्ष भारतीय काँग्रेस पक्ष आहे. तो गांधी परिवाराच्या नेतृत्वाखाली सक्रीय आहे, हे निर्विवाद सत्य आहे; म्हणूनच आता वेळ आली आहे, ती गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष नेस्तनाबूत करण्याची ! हा पक्ष समुद्राच्या तळाशी बुडवून टाकण्याची ! या पक्षाशी निगडित जे जे राष्ट्रप्रेमी असतील, त्यांनी एकतर राजकारणातून स्वतःला निवृत्त करून घ्यावे, अन्यथा स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना करावी. ते अधिक उचित होईल.

स्वतंत्र भारतातील राज्यघटनेनुसार व्यक्त होण्याचा जो अधिकार दिला आहे, त्या अधिकाराखाली हे सांगावेसे वाटते. हीच ती वेळ आहे, मालेगाव बाँबस्फोटातील घटनांवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ‘आता गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष भारतीय लोकशाहीच्या राजकीय पटलावरून काढला पाहिजे, नेस्तनाबूत केला पाहिजे हेच खरे !’

श्री. श्रीनिवास माधवराव वैद्य, सनदी लेखापाल, सोलापूर. (३१.७.२०२५)

संपादकीय भूमिका

आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या सैनिकी कारवाईला ‘तमाशा’ संबोधणार्‍या काँग्रेसवर बंदी घाला, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !