
१. २९ सप्टेंबर २००८ या दिवशी मालेगावमध्ये दुचाकीमध्ये बॉम्बस्फोट झाला. या घटनेत एकूण ७ जणांचा मृत्यू झाला, तर ९२ जण घायाळ झाले होते.
२. तत्कालीन आघाडी सरकारने या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे देण्याची घोषणा केली. पथकाचे तेव्हाचे प्रमुख हेमंत करकरे होते. वर्ष २००८ मधील आतंकवादी आक्रमणात त्यांचा मृत्यू झाला.
३. स्फोटके ठेवलेली दुचाकी माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची असल्याने पोलिसांना त्यांना अटक केली. पुढच्या काही काळात मध्यप्रदेश, महाराष्ट्रात पुणे आणि नाशिक येथून काहींना अटक करण्यात आली.
📍 Malegaon Bomb Blast: Timeline Recap
🗓️ 29 Sept 2008: Bike bomb blast kills 7, injures 92.
👮♂️ Case handed to ATS under Hemant Karkare.
🚓 Bike traced to Sadhvi Pragya; arrests followed across MP, MH.
📑 Jan 2009: Chargesheet against 14 under MCOCA.
🔄 2010: Case… pic.twitter.com/M2SJnwfJox
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 31, 2025
४. २० जानेवारी २००९ या दिवशी या दिवशी १४ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट केले गेले. ‘मकोका’ (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज्ड क्राईम ॲक्ट अर्थात् महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध) कायद्याची कलमेही लावण्यात आली.
५. वर्ष २०१० मध्ये प्रकरणाचे अन्वेषण ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’कडे हस्तांतरित करण्यात आले.
६. वर्ष २०१७ मध्ये विशेष न्यायालयाने ‘मकोका’ हटवायला जरी अनुमती दिली, तरीही साध्वी प्रज्ञा सिंह आणि इतर ६ जण यांना दोषमुक्त करायला मान्यता दिली नाही. त्यांच्यावर पुढील खटला इतर कलमे आणि ‘अनधिकृत कृत्ये प्रतिबंध कायदा’ चालू राहिला.
७. या प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह ७ मुख्य आरोपींविरुद्ध डिसेंबर २०१८ मध्ये प्रत्यक्ष खटला चालू झाला. खटल्यात एकूण ३२३ साक्षीदार उपस्थित झाले, ३४ साक्षीदार पलटले आणि काही साक्षीदारांचा या कालावधीत मृत्यू झाला.
८. एकूण ३२३ साक्षीदार पडताळले, ३४ साक्षीदार पडताळणीच्या काळात पलटले. फितूर झालेल्यांपैकी अनेकांनी ‘आतंकवादविरोधी पथकाने बळजोरीने जबाब लिहून घेतले’, असे न्यायालयाला सांगितले होते.
९. १७ वर्षांनी म्हणजे ३१ जुलैला या प्रकरणाचा निकाल लागला आणि त्यांतील ७ आरोपींची निर्दाेष सुटका झाली.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !