चिनी आस्थापनांचा हिंदुद्वेष !

भुवनेश्वर (ओडिशा) – चीनमधील ‘अलीएक्सप्रेस’ या ऑनलाईन वस्तूंची विक्री करणार्या आस्थापनाने ‘भगवान जगन्नाथ मंडला आर्ट डोरमॅट’ या नावाने एक पायपोसची ऑनलाईन विक्री आरंभली आहे. या पायपोसवर भगवान जगन्नाथाची प्रतिमा छापलेली आहे. हिंदु श्रद्धेचा अपमान करणार्या या कृतीमुळे सामाजिक माध्यमांवर हिंदूंनी यावर टीका केली असून संताप व्यक्त केला आहे.
🚨 Cultural Assault on Sanatan Dharma!🚨
Bhagwan Jagannath’s image printed on doormats sold on @AliExpress_EN – a disgraceful act of desecration.
⚠️ Anti-Hindu actions by Chinese company!
Such insults continue due to lack of global Hindu unity.
⚖️ Time to unite & take legal… pic.twitter.com/GBbbyLuIlE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 31, 2025
१. या पायपोसच्या विज्ञापनात एका व्यक्तीला त्या प्रतिमेवर पाय ठेवतांना दाखवले गेले आहे. उत्पादनाच्या वर्णनात त्याला ‘आर्द्रता शोषणारा’ असे सांगितले आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
२. ‘ही गोष्ट म्हणजे धार्मिक विटंबनेची परिसीमा आहे. आंतरराष्ट्रीय मंचांनी अशा प्रकारच्या वस्तूंना अनुमती देऊ नये’, अशा शब्दांत हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे.
३. पुरी (ओडिशा) येथील भगवान जगन्नाथ मंदिर समितीचे माजी सदस्य मधव पुजापंडा यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी मंदिर प्रशासनाला आवाहन केले आहे की, या प्रकरणाची माहिती राज्य आणि केंद्र सरकार यांना दिली जावी आणि चिनी अधिकार्यांशी संपर्क साधून या उत्पादनाच्या विक्रीवर तातडीने बंदी आणली जावी.
४. या आस्थापनाने या उत्पादन ऑनलाईन विक्री तात्काळ थांबवा आणि हिंदूंची क्षमा मागावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे.
(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिकाजगभरात हिंदूंचे परिणामकारक संघटन नसल्यामुळेच हिंदूंच्या देवतांची अशा प्रकारे विटंबना केली जाते. अशी धर्महानी रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होन वैध मार्गांनी असले प्रकार रोखणे आवश्यक ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !