|
मुंबई – पुणे येथील फराह दिबा नावाच्या शिक्षिकेने ‘ऑपरेशन सिंदूर’ची खिल्ली उडवल्याच्या प्रकरणी तिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या विरोधात तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली; पण ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा आहेत. देशविरोधी आणि देशात फूट पाडणारे किंवा राष्ट्राची एकता, अखंडता अन् सार्वभौमत्व यांना धोका निर्माण करणारे संदेश हलक्यात घेता येत नाहीत’, असे सांगत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपिठाने तिची याचिका फेटाळली अन् गुन्हा रहित करण्यास नकार दिला. यानंतर ती नोकरी करत असलेल्या शाळेने तिला निलंबित केले.
१. पुणे येथील महंमदवाडी भागातील ‘मारगोसा हाईट्स’ या इमारतीतील सदस्य ‘व्हॉट्सॲप’च्या गटावर ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी चर्चा करत असतांना फराहने हसण्याचा ‘इमोजी’ (हावभाव) प्रसारित केला, तसेच तिने मोहिमेविषयी आक्षेपार्ह स्टेटस (इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या स्वतःच्या खात्यावर प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण) ठेवले होते.
२. फराहच्या या कृतीमुळे सोसायटीतील सदस्य संतप्त झाले. त्यांनी तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले. त्यानंतर तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
असे संदेश हलक्यात घेता येणार नाहीत ! – न्यायालय
याचिकाकर्त्या सुशिक्षित असून शिक्षिका आहेत. अशांनी सामाजिक माध्यमांवर काहीही प्रसारित करतांना विचार केला पाहिजे. तिने भारताचे सैन्य, पंतप्रधान आणि देश यांच्या विरोधात पोस्ट केल्या आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजून आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केलेले नाही. त्यामुळे गुन्हा रहित करणे योग्य ठरणार नाही. न्यायालयाने तिला आवेदन करण्याची संधी दिली; पण तिने निकाल देण्याची मागणी केली.

उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
बस नाम रहेगा अल्लाह का ?
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था