१. रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे होणारे परिणाम

‘काही लोक रात्री बराच वेळ भ्रमणभाष पहातात. रात्रीची झोप पूर्ण न झाल्याने शरिरात पित्त निर्माण होते. पित्ताने शरिरात उष्णता निर्माण होऊन केस गळणे, पोट साफ न होणे, वायू होणे आदी त्रास होतात. आपली झोप पूर्ण न झाल्यामुळे दुसर्या दिवशी कामात लक्ष लागत नाही, तसेच चिडचिडेपणा वाढतो.
२. अंधारात भ्रमणभाष पाहिल्याने डोळ्यांवर होणारे परिणाम

अंधारात भ्रमणभाष पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि डोळ्यांतून पाणी येते, तसेच उपनेत्र (चष्मा) लागणे किंवा चष्म्याचा क्रमांक वाढणे इत्यादी त्रास होऊ शकतात.
३. हात आणि खांदा यांवर होणारे परिणाम
रात्री भ्रमणभाष बराच वेळ हातात धरून पाहिल्याने हात आणि खांदा यांवर ताण येऊन सूज येते अन् दुखणे चालू होते.’
– डॉ. दीपक जोशी (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स) देवद, पनवेल. (१८.२.२०२५)
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !