संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सन्मान !

पुणे – राज्यसभा खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांना संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन येथे आयोजित सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण झाले. प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी महिला आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, वक्फ बोर्डाच्या संबंधित विषयांवर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाढत चाललेल्या कर्करोगाच्या प्रमाणाविषयी चिंता व्यक्त करत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
‘प्राईम पॉईंट फाऊंडेशन’च्या वतीने प्रत्येक वर्षी लोकसभा आणि राज्यसभेतील उल्लेखनीय कार्याविषयी खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा १७ खासदारांना या पुरस्काराचा मान मिळाला. राज्यसभेत पहिलाच कार्यकाळ असलेल्या प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी संसदेत सक्रीय सहभाग नोंदवला. यंदा राज्यसभेतील प्रभावी कामगिरीसाठी निवड झालेल्या खासदारांमध्ये प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांचा समावेश झाला. महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पुण्यासाठी ही गौरवाची गोष्ट आहे.
पुरस्कार स्वीकारतांना प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘हा सन्मान केवळ माझा नाही, तर जनतेच्या अपेक्षा संसदेत प्रभावीपणे मांडण्याच्या प्रयत्नांचा गौरव आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधीची खरी ओळख त्याच्या कृतीशीलतेत असते. यापुढे परखड भूमिका मांडत राहीन.’’
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !