
‘३०.१.२०२५ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) आणि श्री. आनंद जाखोटिया (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३८ वर्षे) यांच्याशी भ्रमणभाषवर बोलत होत्या. त्या वेळी मीही तिथे होते. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ त्या दोघांना म्हणाल्या, ‘‘आनंद’ हे आनंदाचे आणि ‘चेतन’ हे चैतन्याचे प्रतीक आहे.’’ त्यावर श्री. चेतन म्हणाले, ‘‘वर्ष २०१० मध्ये एका सेवेच्या संदर्भात मी आणि श्री. आनंद परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलत असतांना त्यांनीही अगदी हेच वाक्य म्हटले होते. आज तुम्हीही तेच वाक्य म्हटल्याने आम्हाला ‘गुरुतत्त्व एकच आहे’, याची प्रचीती आली !’’

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. या प्रसंगातून ‘गुरुतत्त्व एकच असून ते कसे कार्यरत आहे’, हे मला शिकायला मिळाले.’
– सौ. प्रियांका चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ३८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.२.२०२५)
गुरुपौर्णिमेला ३२ दिवस शिल्लक
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’