अमरावतीच्या श्री सोमेश्वर महादेव संस्थानचे भूमी प्रकरण

मुंबई, १८ जुलै (वार्ता.) – श्री सोमेश्वर महादेव संस्थान, अमरावती या धार्मिक संस्थानच्या मालकीची अमरावती येथील ५० कोटी रुपयांची शेतभूमी केवळ ९६० रुपयांना सुमन रामरतन कोठार यांना खरेदी करण्यास देण्याचे आदेश २६ नोव्हेंबर २०२४ या दिवशी तहसीलदारांनी पारित केले होते. याविरोधात उप विभागीय अधिकारी, अमरावती यांचे न्यायालयात अपील प्रलंबित आहे. त्यामुळे भूमी खरेदीचा व्यवहार पूर्ण झाला नाही, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी उत्तरामध्ये दिली. राज्यातील देवस्थानांच्या शेतभूमीसाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ (प्रतिबंध) कायदा लागू करण्याविषयी शिवसेनेचे सदस्य अमोल खताळ यांनी विधान सभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचा विरोध
संस्थानची भूमी खरेदी करण्याच्या आदेशाला महाराष्ट्र मंदिर महासंघाने विरोध दर्शवला होता. तहसीलदार विजय लोखंडे यांनी अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी महासंघाचे राज्य कोअर कमिटीचे अनुप जयस्वाल, महासंघाचे जिल्हा निमंत्रक कैलास पनपालिया यांनी केली होती.
सुमन कोठार यांनी जमिन खरेदी करण्याचा अर्ज तहसीलदार विजय लोखंडे यांच्याकडे सादर केला. या प्रकरणी तहसीलदार यांनी कुळ कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून, कोणतेही साक्षी पुरावे न गेता संस्थानच्या मालकीची ५० कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली जमीन केवळ ९६० रुपयांमध्ये खरेदी करून देण्याचा आदेश पारित केला होता. जमीन महसूलाच्या माफीबाबत (क्र. १) अधिनियम १८६३, यामधील तरतुदींनुसार सर्वसाधारणत: धार्मिक किंवा धर्मादाय संस्थांनी धारण केलेल्या तसेच अशंत: व पूर्णत: सारामाफी असलेल्या जमिनींचे हस्तांतरण करता येत नाही.
मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
बसस्थानके आणि बसगाड्या यांची प्रत्येक ४ घंट्यांनी स्वच्छता होणार ! – परिवहनमंत्री
गोव्यात मौसमी पावसाचे आगमन