
‘वर्ष २०१३ मधे माझी एक दाढ किडल्याने दंतवैद्यांनी तिचे ‘रूट कॅनल’ केले होते. ‘रूट कॅनल’ करतांना काहीतरी गडबड झाल्याने माझी ती दाढ दुखत होती. त्यामुळे मधे मधे दाढ सुजणे, ‘इन्फेक्शन’मुळे तीव्र वेदना होणे, असे त्रास मला होत असत. त्या वेदना आणि सूज तात्कालिक औषधे, प्रतिजैविके घेतल्यावर न्यून होत; परंतु काही महिन्यांनी पुन्हा आजार उफाळून येत असे. पुढे कोरोना महामारी आल्याने मध्यंतरी दोन वर्षे मला त्या दाढेवर काहीच उपचार करून घेता आले नाहीत. दंतवैद्यांच्या सल्ल्यानुसार माझ्याकडे ती दाढ काढणे किंवा प्रतिजैविके घेत दिवस काढणे, असे दोन पर्याय होते. तिसरा पर्याय त्या दाढेचे केलेले ‘रूट कॅनल’ काढून दुर्बिणीद्वारे परत नव्याने ‘रूट कॅनल’ करणे, असा होता. तो पर्याय पुष्कळ महागडा होता आणि ‘तो प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता ४० टक्केच आहे’, असे दंतवैद्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांचाही कल दाढ काढण्याकडेच होता.

अशातच होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांच्याशी मी या विषयावर चर्चा केली आणि ‘‘होमिओपॅथीमध्ये दातांच्या आजारावर प्रभावी औषध नाही का ?’’, असे सहजच विचारले. तेव्हा त्यांनी मला होमिओपॅथीच्या दोन प्रकारच्या गोळ्या दिल्या, त्यातील एक वेदनाशामक होती आणि दुसरी ‘इन्फेक्शन’ नष्ट करणारी होती. त्यासह त्यांनी मला होमिओपॅथीचे दंतमंजन उपयोगात आणण्याचे समुपदेशन केले. त्याप्रमाणे औषधोपचार घेतल्यानंतर आणि त्यांनी सांगितलेले दंतमंजन उपयोगात आणल्यावर जेमतेम १ आठवड्यात माझ्या दाढेची सूज न्यून होऊन वेदनाही दूर झाल्या. दातांच्या अन्य समस्या, उदा. दातांना पाणी प्यायल्यावर किंवा गोड खाल्ल्यावर कळ येणे, दात शिवशिवणे, दातांची झीज होणे इत्यादी बरेच त्रास दूर झाले. तेव्हापासून आजतागायत गेल्या ३ वर्षांत माझे दाढेचे दुखणे (इन्फेक्शन होणे) केवळ ३ ते ४ वेळा उफाळले; परंतु मला ते लक्षात येताच मी त्याच वेळी होमिओपॅथी औषधोपचार केल्याने दुखणे लगेचच दूर झाले.
याचप्रमाणे मला होणारा अर्धशिशीचा त्रास, सतत होणारी सर्दी, हाताचे दुखणे, थकवा, निरुत्साह इत्यादी समस्याही होमिओपॅथीच्या औषधांनी लक्षणीय न्यून झाल्या आहेत. यातून मला होमिओपॅथीचे महत्त्व लक्षात येऊन गुरुकृपेने मेहता यांच्याप्रमाणे योग्य निदान आणि उपचार करणारे वैद्य लाभले, याविषयी कृतज्ञता वाटते.’
– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक (२८.६.२०२५)
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !