
आणीबाणीच्या काळ्या, कठोर काळामध्ये ‘पुन्हा लोकशाही आणि विचारस्वातंत्र्य कधीच परत मिळणार नाही’, अशी पोलादी पाशवी शक्ती इंदिरा गांधी आणि काँग्रेस यांची होती. सरकारविरुद्ध बोलणे-लिहिणे गुन्हा होता. आम्ही सहस्रो कार्यकर्ते कारागृहात डांबले गेलो. राजकीय पक्ष, वृत्तपत्रे, विचारवंत, व्यापारी हे सर्व इंदिरा गांधींना शरण जात होते. ‘अनुशासन पर्व’ म्हणून आणीबाणीचा गौरव करत इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीची तळी अन्य काही पक्ष आणि विनोबा भावे हेही उचलत होते. अभिव्यक्तीस्वातंत्र्य संपले होते. अशी परिस्थिती असूनही मला एक दुर्दम्य विश्वास होता की, यातून प्रकाशाचा… लोकशाहीचा… अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुन्हा उदय होऊन आपण मोकळा श्वास घेऊ.

वयाच्या २० व्या वर्षी मी एक कविता लिहून मी आणीबाणीप्रणित दडपशाहीचा प्रतिकात्मक काव्यरूप निषेध केला. माझ्या ‘जे.जे.कॉलेज’च्या वर्ष १९७६ च्या ‘मराठी वाङ्मय मंडळा’चा मी सचिव म्हणून संपादित केलेल्या विशेषांकात ती कविता छापली होती. महाविद्यालयाच्या सूचनाफलकवरही लावली होती. कवी हा पहिला द्रष्टा क्रांतीकारी असतो. तो जे उदात्त स्वप्न पहातो, ते साकारते. पुढील काळात त्याची प्रचीती लवकरच आली. रा.स्व. संघ परिवाराच्या नेतृत्वाखाली मोठे जनआंदोलन होऊन इंदिरा गांधी यांचा राजकीय आणि नैतिक पराभव सामान्य जनतेने मतपेटीद्वारे केला. हा इतिहास आम्ही वर्ष १९७७ मध्ये लगेच पाहिला. निशांत झाला. लोकशाही पुन्हा तेजाने तळपू लागली. देश आणि राज्यघटना यांचे रक्षण झाले. या घटनेला २५ जून २०२५ या दिवशी ५० वर्षे झाली. त्यानिमित्त पुन्हा त्या काळया कायद्याचा निषेध करतो आणि देशासाठी जनजागरण करण्याचा नवा संकल्प करतो.
‘सत्यमेव जयते । भारत चिरायु होवो ।’
– श्री. विवेक प्र. सिन्नरकर, वास्तूविशारद आणि ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ लेखक, कोथरूड, पुणे.
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !