यवतमाळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव !

यवतमाळ – मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणार्या डॉ. आनंद भुसारी यांचा सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, ‘‘पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण, विभक्त कुटुंबपद्धत, भ्रमणभाषचा अतिवापर यांमुळे व्यक्ती स्वतःच्या रक्षणासाठी काय करायचे, हे विसरून गेली आहे. धर्म, संस्कृती, योग विसरल्यामुळे गुंड प्रवृत्ती, बालगुन्हेगारी, लव्ह जिहाद, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. त्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह साधना करणे आवश्यक आहे.
‘मी आणि माझे कुटुंब’ यांतून बाहेर पडून राष्ट्र-धर्मासाठी एकत्र येणार्यांचे कुटुंब निर्माण करा ! – प्रफुल्ल खिवंसरा
वणी येथील महोत्सवात धर्मकार्याच्या माध्यमातून सनातन संस्थेशी जोडले गेलेले वणी येथील उद्योजक श्री. प्रफुल्ल खिवंसरा म्हणाले, ‘‘राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी संघटन महत्त्वाचे आहे. संयुक्त कुटुंब हे संघटनाचे आदर्श रूप आहे. ‘एक हैं तो ‘सेफ’ हैं । (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू)’, ‘बटेंगे तो कटेंगे (विभागलो तर कापले जाऊ)’ ही वस्तूस्थिती आहे. त्यासाठी संघटनच महत्त्वाचे आहे. ‘मी आणि माझे कुटुंब’ यांतून बाहेर पडून राष्ट्र-धर्मासाठी एकत्र येणार्यांचे कुटुंब निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करूया.
| उपस्थित मान्यवर
इस्कॉन संप्रदायाचे पू. जगन्नाथ प्रभूजी यांची वंदनीय उपस्थिती लाभली, तसेच श्रीरामनवमी शोभायात्रा समितीचे श्री. मनोज औदार्य, मंदिर विश्वस्त श्री. हरिभाऊ चौधरी, धनगर समाज संघटनेचे श्री. पवन धोटे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र डांगे, जिल्हा बालकल्याण समितीच्या समुपदेशिका सौ. माधुरी चौधरी यांच्यासह ३०० हून अधिक राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक जिज्ञासू उपस्थित होते. |
गुरुपौर्णिमेला ३३ दिवस शिल्लक
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !