
चिंचवड (जिल्हा पुणे) – येथील ‘समीर बँक्वेट अँड लॉन्स’या ठिकाणी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात श्री. विक्रम भावे लिखित ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन विश्व हिंदु परिषदेचे श्री. दादा वेदक आणि हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.
देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य करणार्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये, यासाठी पुस्तक लिहिले ! – विक्रम भावे
‘सीबीआय’सारखी भारतातील प्रमुख अन्वेषण यंत्रणा किती भरकटवलेल्या मार्गाने जाते आणि खर्या गुन्हेगारापर्यंत पोचण्याचा प्रयत्नही न करता निरपराध तरुणांना खटल्यांमध्ये खोट्या पद्धतीने गुंतवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करते, याचे सप्रमाण दाखले या पुस्तकात आहेत. पुस्तक लिखाणामागचा माझा हेतू ‘रडगाण्याचा नव्हता, तर देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य करणार्या शेकडो तरुणांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये’, हा आहे, असे वक्तव्य श्री. विक्रम भावे यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळी केले.
गुरुपौर्णिमेला ११ दिवस शिल्लक
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर