‘काही दिवसांपूर्वी आमच्यात (मी आणि सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ६ वर्षे यांच्यात) बोलणे चालू होते. त्या वेळी पू . वामन मला म्हणाले, ‘‘आई, आपण दोघे मिळून एक खेळ खेळूया. त्यामध्ये आपण एकमेकांना काही प्रश्न विचारायचे आणि त्यांची उत्तरे द्यायची.’’ पू. वामन यांनी विचारलेले वैशिष्ट्यपूर्ण ७ प्रश्न आणि त्या प्रश्नांची त्यांनीच दिलेली उत्तरे ऐकून मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. पू. वामन यांनी विचारलेले वैशिष्ट्यपूर्ण ७ प्रश्न आणि त्या प्रश्नांची त्यांनीच दिलेली उत्तरे

पू. वामन : या विश्वात सर्वांत मोठे मन कुणाचे आहे ?
उत्तर : नारायणांचे. (पू. वामन परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना ‘नारायण’, असे म्हणतात.)
पू. वामन : या विश्वातील सर्वांत मोठे चरण कुणाचे ?
उत्तर : नारायणांचे.

पू. वामन : या विश्वात सर्वांत अधिक प्रेमळ आणि सर्वांची काळजी घेणारे कोण आहेत ?
उत्तर : नारायण.
पू. वामन : या विश्वात सर्वांत मोठी जागा कोणती ?
उत्तर : ‘नारायणांचे चरण’ हीच विश्वातील सर्वांत मोठी जागा आहे.
पू. वामन : भक्तांसाठी सर्वांत अधिक अवतार कुणी घेतले ?
उत्तर : नारायणांनी.
पू. वामन : सर्वांत मोठे चक्र कुणाचे आणि कोणते ?
उत्तर : नारायणांचे सुदर्शनचक्र.
पू. वामन : सर्वांत मोठी गदा कुणाची ?
उत्तर : नारायणांची.
२. पू. वामन यांनी दिलेली उत्तरे ऐकून त्यांच्या आईला जाणवलेली सूत्रे
अ. ‘मी पू. वामन यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेली उत्तरे ऐकली. तेव्हा ‘सतत अनुसंधानात रहाणे, म्हणजे काय असते ?’, ते माझ्या लक्षात आले.
आ. ‘मी साधना आणि गुरुसेवा करते’, असे म्हणणे आणि ‘मनाने अखंड साधनारत रहाणे’, यांमध्ये पुष्कळ अंतर आहे.
इ. ज्यांचा जन्मच गुरुकार्यासाठी आणि ज्यांचे संपूर्ण जीवनच गुरुसेवेसाठी आहे, त्यांच्या जीवनात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गुरुचरणांपाशी असते अन् त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू गुरूच असतात.
३. कृतज्ञता
हे गुरुदेव, ‘आपण मला पू. वामन यांच्या माध्यमातून ‘प्रत्येक क्षणी अखंड अनुसंधानात रहाणे, ‘जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्यापाशीच आहे’, हे सत्य समजून घेणे आणि ‘साधना अन् गुरुचरण हेच अंतिम सत्य आहे ’, हे शिकवत आहात’, त्याबद्दल मी आपल्या अन् पू. वामन यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांच्या आई), फोंडा, गोवा (८.४.२०२५)
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद