‘जसजसा ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईचा तपशील आणि उपग्रहाद्वारे काढलेली छायाचित्रे समोर येऊ लागली, तसतशी ‘या आक्रमणांमुळे पाकिस्तानची नेमकी किती हानी झाली ?’, हे स्पष्ट झाले. ‘प्रिसिजन गाईडेड मिसाईल्स’ने केलेली अचूक आक्रमणे, पाकिस्तानमध्ये १०० कि.मी. घुसून भुईसपाट केलेले आतंकवादी तळ, त्यांच्या हवाई तळांची झालेली हानी, तसेच आक्रमणात मारले गेलेले त्यांचे १०० हून अधिक आतंकवादी, या सर्वांचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकची झालेली हानी त्यांचे कंबरडे मोडणारी आहे. तरीही पाकिस्तानचे नेते आणि सैन्य त्यांच्या नेहमीच्या खोटारड्या शैलीत विजय घोषित करत आहेत आणि त्यांच्या देशातील मूर्ख नागरिक ते मानूनही घेत आहेत.

१. भारताच्या पराक्रमापुढे पाकिस्तान हतबल !
पाकिस्तानने जेट विमान गमावले. त्यांचे दारुगोळ्याचे साठे उडवले गेले. ‘नूर खान’मध्ये अत्यंत कडेकोट सुरक्षा कवचाच्या आत असलेल्या त्यांच्या आण्विक तळावर मिसाईलद्वारे आक्रमण झाले. केवळ ९० मिनिटांच्या आत त्यांच्या ११ हवाई तळांवर आक्रमणे झाली. लाहोर, कराची, रावळपिंडी, भवाहलपूर अशा मोठमोठ्या शहरांवर भारताने आक्रमणे करून हे दाखवून दिले की, मनात आणले, तर पाकिस्तानमध्ये कुठेही भारत सहज घुसू शकतो.

२. पराभूत होऊनही पाकमध्ये ‘विजया’ची भावना !
या सर्व आक्रमणांचे व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध आहे. तरीही पाकिस्तानी सैन्याने पत्रकार परिषदेत ‘व्हिडिओ गेम फुटेज’ आणि ‘पॉवरपॉइंट’द्वारे बनावट चित्रे दाखवून ‘जितंमया जितंमया’ म्हणत स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. पाकिस्तानने अशाच प्रकारे खोटी छायाचित्रे दाखवून भारतीय सेनेचे आदमपूर विमानतळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आणि तेथील एस् ४०० ‘एअर डिफेन्स प्रणाली’ उद्ध्वस्त केल्याचे सांगितले. त्याच विमानतळाला पंतप्रधान मोदी यांनी रीतसर भेट देऊन तेथील वायूसैनिकांशी संवाद साधला आणि पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांमधली हवा काढून घेतली. अर्थात् पाकिस्तान मुळातच एक निर्लज्ज आणि आतंकवादी देश असल्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही.
३. स्वतःच्याच देशावर अविश्वास दाखवणारे नागरिक !
पण हे काही मला धक्का देणारे नाही. पाकचा स्वतःच्या खोटेपणावर प्रचंड विश्वास आहेच; पण येथे सूत्र पाकिस्तानचे नाही. मला संताप येतोय, तो स्वतःला भारतीय म्हणवणार्या लोकांचा, जे स्वतःच्याच देशावर विश्वास ठेवायला सिद्ध नाहीत. हे तेच लोक आहेत, ज्यांनी तुमच्या-माझ्यासारख्या पाकिस्तानच्या उद्ध्वस्त हवाई तळांच्या त्याच प्रतिमा पाहिल्या आहेत. आक्रमणानंतर सैन्याने दिलेली जी माहिती तुम्ही-आम्ही ऐकली, तीच त्यांनीही ऐकली. आपल्या सैन्यातील अधिकार्यांच्या आवाजातील शांत आणि ठाम आत्मविश्वास त्यांनाही जाणवला आहे. पाकने केलेली ड्रोन आक्रमणे परतवतांनाचे भारताच्या आकाश ‘एअर डिफेन्स’चे फुटेज त्यांनीही पाहिलेले आहे. तरीही ते मान्य करायला सिद्ध नाहीत की, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने विजय मिळवला आहे.

४. इतका अविश्वास कशासाठी ?
कारण ‘त्यांना’ (स्वतःच्याच देशावर विश्वास ठेवण्यास सिद्ध नसणार्यांना) पुराव्यांशी काही देणे घेणे नाही, त्यांना अडचण आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सामान्य नागरिक यांच्या राष्ट्रभक्तीशी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष करता करता ते कधी भारताचा द्वेष करू लागले ?, हे बहुतेक त्यांना कळलेले नाही. आपल्या आसपास हे असे छिद्रान्वेषी आणि कुंठाग्रस्त लोक बरेच आहेत.
५. ‘हे लोक’ भारतातील पाकिस्तानचे दलालच !
अशा लोकांचे पासपोर्ट भारतीय असतात; पण त्यांचा सडका मेंदू मात्र पाकिस्तानी असतो आणि हिंदुद्वेषाने पछाडलेला असतो. भारत कुठल्याही क्षेत्रात प्रगती करतो, तेव्हा हे लोक कण्हत अन् कुंथत स्वतःची वैचारिक मूळव्याध कुरवाळत बसतात, मग ती चांद्रयान मोहीम असो, श्रीराममंदिराचा उद्घाटन सोहळा असो किंवा सध्या जगात चौथ्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था असो. हे लोक भारतातील पाकचे दलाल असतात. पाक जेव्हा उघडपणे खोटे बोलतो, तेव्हा हे लोक त्याचे पुनःप्रसारण करतात. भारत जेव्हा पुराव्यांनिशी सत्य सांगतो, तेव्हा हे लोक शंका घेतात. हे तेच लोक आहेत, जे बालाकोट ‘एअर स्ट्राईक’नंतर पुरावे मागत होते, जे ३७० कलम हटवण्याला ‘हा केवळ प्रसिद्धीचा ‘स्टंट’ आहे’, असे म्हणत होते. हे तेच लोक आहेत, जे श्रीराममंदिराला ‘राजकीय खेळी’ म्हणतात आणि हे तेच लोक आहेत, जे कुठल्याही युद्धात जेव्हा भारत जिंकू लागतो, तेव्हा शस्त्रसंधी करण्यासारखा षंढ सल्ला देतात !

६. जगाला भारताचे सामर्थ्य कळले !
‘ऑपरेशन सिंदूर’ने केवळ पाकमधील आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले नाहीत, तर अशा लोकांनाही उघडे पाडले. ‘ऑपरेशन सिंदूर’ने जगाला दाखवून दिले की, हा काँग्रेस काळातील ‘हम देखेंगे, हम करेंगे’ची खोटी आश्वासने देणारा भारत नाही, तर ‘अरे’ला ‘कारे’ करणारा नवा भारत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने पुराव्यानिशी दाखवून दिले की, आक्रमणाचे प्रत्युत्तर द्यायला आम्हाला आंतरराष्ट्रीय मान्यतेची आवश्यकता नाही. आमच्यावर आक्रमण झाले, तर आमचे प्रत्युत्तर नेहमीच संयमी, सौम्य आणि मुत्सद्दी असणार नाही; म्हणूनच ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक सैन्य कारवाई नव्हती, तर ती होती एक घोषणा – ‘भारतीय सैन्य सामर्थ्याची ! राजकीय इच्छाशक्तीची !’
‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ पाकला दिलेले प्रत्युत्तर नाही, तर ही कारवाई म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिकाला दिलेले आश्वासन आहे की, आपण असाहाय्य नाही. आपल्याला बीबीसीच्या संपादकीय सल्ल्याची आवश्यकता नाही. जग काय म्हणते ?, याच्याशी देणेघेणे नाही. आजचा कणखर भारत घरात घुसून मारतो.
७. युद्ध अंतर्गतही लढावे लागते !
‘ऑपरेशन सिंदूर’ने आपल्याला हेही शिकवले की, युद्ध केवळ सीमारेषेपलीकडे लढावे लागत नाही, तर आतमध्येही लढावे लागते. भारतात, आपल्या अवती-भवती, ‘टीव्ही न्यूज रूम’मध्ये, विद्यापिठांमध्ये, ‘इंस्टाग्राम’साख्या सामाजिक माध्यमांवर, ‘युद्ध हे उत्तर असू शकत नाही’(War is not the answer), असे म्हणणार्या बिनडोक ‘रील्स’मध्ये, अशा सर्व ठिकाणी युद्ध लढावे लागते ! हे युद्ध आपल्या कार्यालयांमध्ये, आपल्या गृहसंकुलांमध्ये आणि आपल्या कुटुंबाच्या व्हॉट्सॲप गटामध्येही लढावे लागते.

८. देशावर अविश्वास दाखवणार्यांविरुद्ध आवाज उठवणे, हे सामान्य नागरिकांचे ‘ऑपरेशन सिंदूरच !’
‘ऑपरेशन सिंदूर’ने आपल्याला अजून एक गोष्ट शिकवली की, सैनिक होण्यासाठी गणवेशच पाहिजे, असे नाही. आज प्रत्येक भारतीय नागरिक हा कथानक युद्धातील (‘नॅरेटिव्ह वॉर’मधला) एक सैनिक आहे. आपले सैन्य बंदुकींनी लढतात, तर आपली शस्त्रे तर्क, तथ्य, विवेक आणि निर्भयता असायला हवी. त्यांच्या खोट्या कथानकाला पराभव करायला हवा; म्हणून जेव्हा ते म्हणतात, ‘पुरावे द्या’, तेव्हा आपण म्हणायला हवे, ‘किती छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवू ?’ जेव्हा ते म्हणतात, ‘भारत आक्रमक आहे’, तेव्हा आपण अभिमानाने म्हणायला हवे, ‘हो. आहे, बोला मग?’
हे केवळ आपल्या शूर सैनिकांचे ऋण नाही, ज्यांनी थेट शत्रूच्या प्रदेशात घुसून आक्रमण केले, हे ऋण भारताच्या पुढच्या पिढ्यांचेही आहे आपल्यावर; कारण ‘शांतता म्हणजे दुर्बलता नव्हे’, हे आपण सांगायला हवे. या समाजयुद्धात सत्य हे शस्त्र आहे आणि स्मृती ही रणनीती आहे. आपले प्रत्येक ट्वीट, प्रत्येक पोस्ट, देशातील अंतर्गत शत्रूंचा चेहरा उघडा पाडून त्यांचे असत्य खोडून काढणारा आपल्या प्रत्येकाचा आवाज, हेच आहे तुमचे-आमचे ‘ऑपरेशन सिंदूर !’
– सौ. शेफाली वैद्य, ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ लेखिका, पुणे.
संपादकीय भूमिकाआजचा भारत असाहाय्य नव्हे, तर कणखर झाला आहे, हे दर्शवणार्या ‘ऑपरेशन सिंदूर’प्रमाणे अनेक मोहिमा वारंवार घडायला हव्यात ! |
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड