‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे यांचा पंढरपूर येथे वारकरी संप्रदाय आणि संघटना यांच्या वतीने विविध ठिकाणी सत्कार अन् पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम !

पंढरपूर – हिंदुत्वासाठी कार्य करणार्या, तसेच ‘दाभोलकर हत्या आणि मी’, पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे यांचा पंढरपूर येथे ठिकठिकाणी सत्कार अन् पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी ‘बहुसंख्य हिंदु असलेल्या या हिंदूबहुल देशात मला हिंदुत्वनिष्ठ असल्यानेच कारागृहवास पत्कारावा लागला, हे माझे दुर्दैव आहे’, अशी खंत श्री. विक्रम भावे यांनी व्यक्त केली. हिंदु धर्म, देवता यांच्यावर टीका करणारे डॉ. दाभोलकरांच्या विचारांचेच असलेले लोक वारीमध्ये त्यांच्या दिंड्या घेऊन येत आहेत, हे गंभीर आहे. या संदर्भात वारकर्यांनीही आता जागृत राहिले पाहिजे, असे सामायिक मनोगत ‘मालेगाव स्फोटामागील अदृश्य हात’ आणि ‘दाभोलकर हत्या आणि मी’, या पुस्तकांचे लेखक श्री. विक्रम भावे यांनी मांडले, तसेच ‘दाभोलकर हत्या आणि मी’, या पुस्तकाद्वारे त्यांना कशा प्रकारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडामध्ये गोवले गेले, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, श्री. विनीत पाटील उपस्थित होते.



१. फसणेबाबा मठ येथे आयोजित कार्यक्रमात ४५० भाविक उपस्थित होते. या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी उपस्थितांना संबोधित केले. धर्मावर कशा प्रकारे विविध आघात होत आहेत. त्यासाठी वारकरी म्हणून काय करता येईल ? याविषयी त्यांनी संबोधित केले.

२. धर्मकार्य करत असल्याविषयी श्री. विक्रम भावे यांचा महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

३. आळंदी येथील ‘ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती’चे डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते ‘दाभोलकर हत्या आणि मी’, या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक