मानसिक आरोग्य चांगले रहात असल्याचा, चिडचिडेपणा घटत असल्याचा आणि एकाग्रता वाढत असल्याचा दावा !

न्यूयॉर्क – येथील ब्रुकलिनमधील विल्यम्सबर्ग येथील योग स्टुडिओमध्ये योगाद्वारे नाभीचक्र (मणिपूरचक्र) आणि मूलाधारचक्र जागृत करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. या योगाच्या कार्यशाळेमध्ये प्रौढांव्यतिरिक्त अनेक युवक आणि लहान मुले सहभागी झाली होती. हा प्रयत्न मुलांची मानसिक शांतता निर्माण करणे, भावनिक संतुलन राखणे आणि आत्मनियंत्रण वाढवणे, यांसाठी होता. या योगाच्या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य चांगले रहात असल्याचा, चिडचिडेपणा घटत असल्याचा आणि एकाग्रता वाढत असल्याचा दावा करण्यात आला.
🧘♂️🧠 Yoga Awakening Young Minds in America! 🇺🇸✨
From NYC to Michigan, an emotional & spiritual revolution is taking root!
Parents & experts turn to Yoga & Meditation to awaken the Muladhara & Manipura chakras in children. 🔥🌱
🔑 Key Highlights:
🔹 Improved focus, reduced… pic.twitter.com/7z1pY9fctl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 3, 2025
१. अमेरिकेत असे मानसिक उपक्रम लोकप्रिय होत आहेत. आई-वडील आता मुलांचा केवळ अभ्यास किंवा संगीत वर्गांवर लक्ष केंद्रित करत नाहीत, तर त्यांच्या भावनिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व देत आहेत.
२. मिशिगनच्या मरीना ग्लेकेल यांनी त्यांचा मुलगा टोनीसाठी ध्यान प्रशिक्षक वेरोनिका यांचे साहाय्य घेतले. टोनी मधुमेहाने ग्रस्त आहे. ध्यानामुळे त्याला त्याचे शरीर समजून घेण्यास आणि ताण अल्प करण्यास साहाय्य झाले. योगामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहू लागली. मरीना आता त्यांच्या दोन्ही मुलांसाठी ऑनलाइन सत्रे आयोजित करते.
३. मधुमेहतज्ज्ञ डॉ. मेरेडिथ विल्क्स म्हणतात, ‘तणाव, चिंता आणि नैराश्य या गोष्टी शरिरातील साखरेच्या नियंत्रणावर परिणाम करतात. योग आणि ध्यान मुलांना हा ताण घालवण्यासाठी साहाय्य करतात.
४. सेबॅस्टियन अलाप्पट यांनी ‘द स्पार्क’ नावाचा कला, योग आणि ध्यान यांविषयी कार्यक्रम चालू केला आहे. सेबॅस्टियन म्हणतात की, योग आणि दीर्घ श्वासोच्छ्वास मुलांना लवचिकता आणि आत्मनियंत्रण शिकवतात.
५. मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षक यांच्याकहूनही आता पालकांना त्यांच्या मुलांना योग आणि ध्यान शिकवण्याचा सल्ला दिला जात आहे, जेणेकरून मुले राग आणि ताण यांच्यावर नियंत्रण राखू शकतील.
६. बाल मानसशास्त्रज्ञ किम टिंग्ले म्हणतात, ‘आजची पिढी मोबाइल आणि गॅजेट्स यांमध्ये मोठी होत आहे. यामुळे त्यांच्यात एकाग्रतेचा अभाव स्पष्ट दिसून येतो. अशा परिस्थितीत ध्यान आणि योग यांसारखे क्रियाकल्पही महत्त्वाचे आहेत.
७. ‘पेडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट’ असलेल्या मिशेल किर्नोजेक वेगवेगळ्या स्टुडिओत वर्ग घेतात. त्या मुलांना दीर्घ श्वास घेण्यास शिकवणारे ‘सॉफ्ट टॉय’ आणि श्वास सोडण्यास नियंत्रित करण्यास साहाय्य करणारे ‘पिनव्हील’ यांसारखी योगतंत्रे शिकवण्यास साहाय्य करणारी साधने उपलब्ध करून देतात. ही साधने मुलांना खेळीमेळीच्या वातावरणात ध्यान आणि शांती या गोष्टी शिकवतात. या उपायांचा परिणामदेखील दिसून येतो. याद्वारे अनेक मुलांचा चिडचिडेपणा अल्प झाला असून त्यांची भावंडे आणि मित्र यांच्याशी भांडण्याऐवजी तर्कशुद्धपणे बोलू लागली आहेत.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
World Yogasana Championship : आजपासून कर्णावती (गुजरात)मध्ये पहिली विश्व योगासन स्पर्धा !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत