दुसर्या महायुद्धात अमेरिकेसाठी लढलेले उदारमतवादी जॉन केनेडी एकेकाळी अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचा चेहरा होते. आज त्याच डेमोक्रॅटिक पक्षाचा चेहरा ठरले आहेत कट्टर मार्क्सवादी, ‘वोकिझम’च्या (वोकिझम म्हणजे जगभरात प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी विकृती !) नावाखाली अत्यंत घातक आणि विध्वंसक धोरणांचे समर्थन करणारे, जिहादी इस्लामचे समर्थक, ज्यू आणि हिंदु द्वेष्टे झोहरान ममदानी ! न्यूयॉर्क शहराच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत हे ममदानी महाशय इतके पुढे आहेत की, त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाल्यातच जमा आहे. न्यूयॉर्क हा डेमोक्रॅटिक पक्षाचा गड असल्यामुळे ते शहराचे महापौर बनतील, अशी दाट शक्यता आहे.

१. मार्क्सवाद्यांच्या योजनेचे फळ, म्हणजे झोहरान ममदानी यांना मिळालेली उमेदवारी !
हे आपोआप घडलेले नाही, तर मार्क्सवाद्यांनी १०० वर्षांपूर्वी आखलेल्या आणि पिढ्यान्पिढ्यांच्या अथक प्रयत्नांनी कार्यवाहीत आणलेल्या सैतानी योजनेला आलेले विषारी फळ आहे. कलह आणि संघर्ष हा मार्क्सवादाचा गाभा आहे. समाजाला गटागटांत विभाजित करायचे, या गटांमध्ये सतत संघर्ष भडकत ठेवायचा, ज्यातून हिंसा आणि अराजक यांचे दुष्टचक्र चालू होईल आणि शेवटी जागतिक सुव्यवस्था कोसळून मार्क्सवादाची पहाट होईल, अशी यांची योजना असते. मूळ मार्क्सवादात हे विभाजन, भांडवलदार विरुद्ध कामगार अशा आर्थिक आधारावर केले जात असे. यात यश मिळत नाही, हे कळल्यावर त्यांनी विभाजन आणि संघर्ष यांचा मूळ आर्थिक आधार सोडून दिला अन् सांस्कृतिक आधारावर संघर्ष निर्माण करण्याची योजना आखली. हाच तो सांस्कृतिक मार्क्सवाद किंवा ‘वोकिझम’. यामुळे ‘गरीब विरुद्ध श्रीमंत’ या एका संघर्षबिंदूच्या ऐवजी ‘गोरे विरुद्ध काळे’, ‘स्त्री विरुद्ध पुरुष’, ‘मूळ नागरिक विरुद्ध स्थलांतरित’, असे अनेक नवे संघर्षबिंदू निर्माण झाले. ‘पाश्चात्त्य देशांमधील लोकशाहीचा वापर करून आम्ही संस्कृतीला बळ देणार्या कुटुंबसंस्था, धर्मसंस्था, देशप्रेम यांसारख्या संस्थांना आतून पोखरत पाश्चात्त्य सभ्यतेचा कसा विध्वंस करणार’, हे त्यांनी वर्ष १९२० ते १९३० च्या दशकातच लिहून ठेवले आहे. या त्यांच्या योजनांमध्ये सांस्कृतिक मूल्ये आणि परंपरा यांची कुचेष्टा, लैंगिकतेचा अतिरेक, अनिर्बंध स्थलांतराला प्रोत्साहन, ‘ट्रान्सजेंडरिझम’चा प्रसार (लिंग पालट करणे), प्रत्येक देशातील किमान एका राजकीय पक्षावर कब्जा…, अशा अनेक पैलूंचा समावेश आहे. या योजना तंतोतंत राबवून त्यांनी पाश्चात्त्य जगताला विशेषतः अमेरिकेला विध्वंसाच्या टोकावर कसे आणून उभे केले आहे, याचे उत्तम उदाहरण, म्हणजे झोहरान ममदानी यांना मिळालेली डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी !
२. झोहरान ममदानी यांचा खरा चेहरा !

हा इसम (ममदानी) कमालीचा ज्यूद्वेष्टा आहे. ‘इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू न्यूयॉर्कमध्ये आले, तर मी त्यांना अटक करीन’, असे ममदानी म्हणतात. ‘ग्लोबलाईज द इंतिफादा’ (Globalize the Intifada – इस्रायल आणि त्याला पाठिंबा देणार्यांविरुद्ध आक्रमक प्रतिकार करण्याची मागणी करणारी घोषणा), अशी हाक देऊन ते जगभरातील ज्यूंविरुद्ध, तसेच इस्रायलशी व्यवहार करणार्या संस्थांविरुद्ध हिंसेला चिथावणी देतात. न्यूयॉर्कच्या ‘टाइम्स स्क्वेअर’मध्ये हिंदूंविरुद्ध गलिच्छ भाषेत घोषणा देणार्या जिहादी जमावाचे त्यांनी नेतृत्व केले होते, तसेच ते पाकिस्तानचे पाठीराखे असून भारतविरोधी कारवाया करणार्या जिहादी आणि खलिस्तानी आतंकवाद्यांना त्यांचे समर्थन आहे. वेश्या व्यवसायाला ‘डीक्रिमिनलाईझ’ (कायद्यातून मुक्त) करावे, असे त्यांचे मत आहे. मादक पदार्थांच्या अधीन झालेल्या व्यसनी लोकांसाठी ‘सेफ इंजेक्शन साईट्स’ (मादक पदार्थ सेवनासाठी कक्ष) असाव्यात, अशी त्यांची योजना आहे. ‘चाईल्ड ॲब्यूज’ (बालशोषण) विरुद्ध असलेले कायदे सौम्य करावे’, असेही ममदानी म्हणतात. सध्याच्या कायद्यात लहान मुलांवर होणार्या अत्याचारांची तक्रार करणार्या व्यक्तीला स्वतःची ओळख उघड करण्याचे बंधन नाही. तसे बंधन असावे, असे या साम्यवादी क्रांतीकारकाचे मत आहे.
स्वतःला मांजर, कुत्रा असे काहीही समजणारे आणि इतरांनी ते मान्य करावे, असा आग्रह असलेले लोक म्हणजे क्विअर (Queer). यांना कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी ‘क्विअर लिबरेशन’च्या धोरणाचा ते पुरस्कार करतात. न्यूयॉर्कमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांना मुक्तद्वार मिळावे, यासाठी ‘फेडरल इमिग्रेशन एन्फोर्समेंट एजन्सी’, या बेकायदा स्थलांतराला आळा घालणार्या शासकीय संस्थेला शहरात कुठलेही सहकार्य न करण्याची त्यांची योजना आहे. न्यूयॉर्कमध्ये अशा प्रकारे अराजक आणि बजबजपुरी माजवण्यात थोडासाही अडथळा येऊ नये; म्हणून पोलीस खात्यासाठी कुठलेही आर्थिक प्रावधान करू नये (Defunding the Police), असे त्यांचे मत आहे. ‘स्थलांतरितांना मुक्तद्वार असावे (Open Borders Policy)’, हा वोक विचार डेमोक्रॅटिक पक्षाने आपलासा केला आहे. ‘हे बेकायदा स्थलांतरित आपले कडवे समर्थक बनतील आणि त्यांच्या मतांवर निवडणुका सहज जिंकता येतील’, हा देशविघातक विचार यामागे आहे, जो भारतियांच्या चांगलाच ओळखीचा आहे.
३. अमेरिकेचे अधःपतन आता अटळ अणि भारताने घ्यावयाचा धडा !
डोके ठिकाणावर असलेली कुठलीही व्यक्ती हेच म्हणेल की, या योजना कार्यवाहीत आणणे, हे समाजाच्या आणि देशाच्या विध्वंसाला आमंत्रण ठरेल; पण अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या समर्थकांना यात सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशकता यांसारख्या गोष्टी दिसतात, इतकी त्यांची सारासार विचारशक्ती ‘वोकिझम’ने पोखरली आहे. असा माणूस निवडून येतो, यावरून अमेरिकेचे अधःपतन तर आता अटळ दिसते; पण भारताने यापासून धडा घ्यायला हवा. पक्षाचे नाव आणि पूर्वपुण्यायी काहीही असली, तरी जर तो पक्ष अर्बन (शहरी) नक्षल्सच्या अन् ‘वोकिझम’च्या आहारी जात असेल, तर त्याला खड्यासारखे लांब ठेवायला हवे.
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (२७.६.२०२५)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?