‘काही दिवसांपूर्वी पू. वामन राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, वय ६ वर्षे) त्यांच्या वडिलांच्या (श्री. अनिरुद्ध यांच्या) समवेत खेळत होते. त्या वेळी पू. वामन आणि त्यांचे वडील यांच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे. पू. वामन यांनी सहजतेने ‘गुरु-शिष्य किंवा देव आणि भक्त यांचे नाते कसे असावे’, याविषयी सांगितले.

१. पू. वामन यांनी ‘नारायण त्यांचे आहेत’, असे नसून ‘ते नारायणांचे आहेत; कारण ते नारायणांची सेवा करणार आहेत’, असे सांगणे
श्री. अनिरुद्ध : पू. वामन, तुम्ही नारायणांचे आहात कि नारायण तुमचे आहेत ?

(पू. वामन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘नारायण’ असे संबोधतात.)
पू. वामन : बाबा, मी नारायणांचा आहे; कारण मी नारायणांची सेवा करणार आहे; म्हणून मी त्यांचा आहे. मी ‘नारायण माझे आहेत’, असे म्हणालो, तर ‘ते माझे गुरु असूनही त्यांनी माझी सेवा करायची’, असे होईल आणि असे कधीच होऊ शकत नाही.
२. पू. वामन यांनी ‘मी नारायणांचा आहे’, असा भाव असेल, तर आपल्यात अहंकार निर्माण न होता शिष्यभाव रहातो’, असे सांगणे
श्री. अनिरुद्ध : तुम्ही नारायणांचे असणे आणि नारायण तुमचे असणे, हे सारखेच आहे ना ?
पू. वामन : बाबा, तसे नसते. आपण (साधक, भक्त आणि शिष्य यांनी) देव, नारायण आणि गुरु यांची सेवा करायची असते. त्यांनी आपली सेवा करायची नसते; म्हणून ‘मी नारायणांचा आहे, मी देवाचा आहे’, असेच आपण नेहमी म्हणायला हवे. तसाच आपला भाव आणि कृती असायला हवी. आपण त्यांचे ऐकायला हवे. ‘देव माझा, गुरु माझे’, असे आपण म्हणालो, तर ‘ते आपले ऐकतात, ते आपली सेवा करतात’, असे होते. बाबा, आपल्यात ‘मी नारायणांचा आहे’, असा भाव असेल, तर आपल्यात अहंकार निर्माण न होता शिष्यभाव रहातो. ‘देव माझा’, असे म्हटले ना, तर आपला अहंकार कधी वाढतो, ते आपल्याला कळतही नाही. आपण देव किंवा गुरु यांच्याकडे ‘मला हे द्या, मला ते हवे’, असे मागतो, म्हणजेच आपण त्यांना आपले काम करायला सांगतो. देवाला किंवा गुरूंना असे सांगणे अयोग्य असते.
३. पू. वामन यांनी ‘सर्व नारायणच शिकवतात’, असे सांगून कर्तेपणा अर्पण करणे
श्री. अनिरुद्ध : खरे आहे. पू. वामन, तुम्हाला हे सगळे कुणी शिकवले?

पू. वामन : बाबा, मला हे सगळे नारायणच शिकवतात. अन्य कुणाला हे ठाऊक नसते.
मी हा संवाद ऐकत होते.
४. पू. वामन यांचे बोलणे ऐकतांना जाणवलेली सूत्रे
अ. ‘पू. वामन सुस्पष्ट आणि तत्त्वनिष्ठतेने बोलत आहेत’, असे मला जाणवत होते.
आ. त्यांच्या बोलण्याची गती कुठेही अल्पाधिक झाली नाही. त्यांच्या बोलण्यात चढ-उतार नव्हता. ते एका लयीत शांतपणे सांगत होते.
इ. त्यांच्या बोलण्यात कुठेच शब्द किंवा वाक्य यांची पुनरावृत्ती नव्हती. ते न्यूनतम शब्दांत सांगतात.
ई. पू. वामन यांच्या बोलण्यात सहजता, प्रगल्भता, नम्रता, स्थिरता आणि ‘सर्व काही नारायणच करतात’ हा भाव, हे सर्व एकाच वेळी जाणवते.
प.पू. गुरुदेव, आपल्याच कृपेने आम्हाला पू. वामन यांच्या माध्यमातून अध्यात्माचा गाभा असलेली सूत्रे शिकायला मिळत आहेत. ‘आमचा अहंकार किती लहान-सहान दिसणार्या गोष्टींमध्ये लपलेला असतो’, याची आम्हाला जाणीव झाली. वरवर पहाता ‘आपला ‘देव माझा आहे’, हा विचार भावाच्या स्तरावर आहे’, असे वाटत असले, तरीही ‘अध्यात्मात आपण शिकतच पुढे जायचे असते’, हे यातून लक्षात आले.
‘प.पू. गुरुदेव, ‘पू. वामन साधनेच्या संदर्भातील सूत्रे सांगत असतांना ‘आपण त्यांना अंतरंगातून शिकवत आहात, घडवत आहात’, हे आपल्याच कृपेने आम्हाला अनुभवायला मिळत आहे’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांच्या आई), फोेंंडा, गोवा. (७.५.२०२५)
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !