भूतबाधेवरून अडीच वर्षांच्या मुलाला चटके आणि मारहाण !
मुंबई – भांडुपमध्ये बाटलीबंद पाणी विकण्याच्या एजन्सीमध्ये काम करणार्या महिलेचा अडीच वर्षाचा मुलगा वारंवार रडत होता. त्याला भूतबाधा झाल्याने तो रडत असल्याचे एजन्सीचे मालक वैभव आणि त्यांची पत्नी हर्षदा यांनी महिलेला सांगितले. त्यावर उपाय असल्याचे सांगत त्यांनी मुलाला चटके देऊन काठीने मारहाण केली. तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी अघोरी प्रथा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली.
पिस्तुल विक्री करणारा अटकेत !
मुंबई – डॉकयार्ड येथे निर्जनस्थळी शस्त्रविक्री होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. २६ जून या दिवशी अजयकुमार दिवाकर (वय २४ वर्षे) हा तरुण परिसरात आला. त्याच्या झडतीत ३ पिस्तुल, ३ मॅगझीन आणि १० जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली.
अल्पवयीन मुलीवर २ वर्षे अत्याचार !

अकोला – येथील अल्पवयीन मुलीला अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन नराधमाने २ वर्षे वारंवार अत्याचार केला. पीडित मुलीने हा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी आरोपी सुनील देवकर (वय २५ वर्षे) याला अटक केली.
संपादकीय भूमिकामुलींनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे घेतल्यास अशा प्रसंगात स्वरक्षण करता येईल ! |
पादचारी महिलेचे मंगळसूत्र पळवले !

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील कोपर उड्डाणपुलाजवळून चालत जाणार्या महिलेला जोरदार धक्का देऊन चोराने तिला भूमीवर ढकलून दिले आणि तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या प्रकरणी महिलेने
तक्रार केली आहे. (पोलिसांचा धाक उरला नसल्याने वारंवार अशा घटना घडतात ! – संपादक)
पलावा वसाहतीमधून अमली पदार्थ जप्त !

डोंबिवली – शिळफाटा रस्त्यावरील पलावा वसाहतीमधील एका इमारतीमधून मानपाडा पोलिसांच्या विशेष पथकाने २६ जूनच्या रात्री धाड घातली. या वेळी २ किलो मॅफेड्रोन (एम्डी) पावडर जप्त केली आहे. या अमली पदार्थाची किंमत २ कोटी रुपयांहून अधिक आहे. या प्रकरणी पोलिसांनी २० ते २६ वर्षे वयोगटातील २ तरुणांसह २१ वर्षीय महिलेला अटक केली.
संपादकीय भूमिकालोकांना व्यसनाधीन बनवून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! |

Fake Currency Racket : कर्नाटक : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)