|

जेजुरी (पुणे), २५ जून (वार्ता.) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या मार्गावर जेजुरी येथे हिंदु जनजागृती समिती आणि ‘डॉ. प्रसाद खंडागळे मित्रपरिवार’ यांच्या वतीने विठ्ठलभक्तांसाठी विनामूल्य आरोग्यसेवा प्रदान करण्यात आली. या वेळी भाविकांना विनामूल्य शेंगदाणा चटणीच्या पाकिटांचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमात महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि कै. सुधाकर उपाख्य वामन अंबादास खंडागळे अध्यासन यांनीही सहभाग घेतला. वारकरी भाविकांचे कक्षाद्वारे हिंदु जनजागृती समिती आणि डॉ. प्रसाद खंडागळे मित्रपरिवार यांच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचा कक्ष मल्हार देवस्थानाच्या शेजारीच मुख्य रस्त्यावर होता. या वेळी मोठ्या संख्येत भाविकांनी विनामूल्य औषधांचा लाभ घेतला. औषधोपचार आणि शेंगदाणा चटणी वाटपाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी कक्षावर पुष्कळ गर्दी केली होती.
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
पुण्यात श्री निवडुंगा विठोबा देवस्थान येथे पालखी सोहळ्याची जय्यत सिद्धता !