गोवंश

परात्पर गुरु पांडे महाराज

‘गाय हा केवळ पशू नसून ती चैतन्याची मूर्ती असल्याने तिच्यात ३३ कोटी देवतांचे वास्तव्य असल्याचे संबोधले जाते. तिच्यापासून निर्माण होणारे दूध, दही, तूप यांमुळे शरीर पुष्ट होते आणि मानसिक सामर्थ्य मिळते. त्याचसमवेत सत्प्रवृत्ती वाढते. व्याधींचे निवारण होते. अन्नापासून मन बनत असल्यामुळे गायीचे दूध आणि तूप यांपासून मन शुद्ध होऊन वृत्ती सद्शील बनते. तिच्या सहवासाने वातावरणही सात्त्विक आणि चैतन्यमय रहाते. गोमूत्र, गोमय यांचे पुष्कळ उपयोग आहेत. गोमयापासून बनलेल्या खतापासून धान्य पुष्टीकारक बनते. गोमूत्राचा उपयोग औषधासाठी, वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणासाठी होतो. अशा अनेक उपयोगितेमुळे आणि तिच्या चैतन्याद्वारे होणार्‍या परिणामांमुळे वेदांमध्येही तिला महत्त्व दिले आहे; म्हणूनच तिला ‘गोमाता’ संबोधले जाते. यासाठी भारतीय गोवंश वर्धनाकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. म्हणजे वातावरण शुद्धी होऊन प्रजाही सशक्त आणि समर्थ होईल. यासाठी संपूर्ण देशात गोहत्याबंदी करून गोमांस निर्यातीवर तत्परतेने पायबंदी आणणे अतीआवश्यक आहे. यामुळे मानवी वृत्ती सज्जन होऊन सदाचारात वाढ होईल.’

– (कै.) परात्पर गुरु परशराम पांडे