पालखी सोहळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी पुणे येथे आढावा बैठक पार पडली !

पुणे – ‘आषाढी पालखी सोहळ्याच्या कालावधीत वारकर्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पालखी तळ, मुक्कामाचे ठिकाण आणि संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात’, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनाच्या वतीने आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. विधान भवन, पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२५ पूर्वसिद्धता आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते. या वेळी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबवण्यात येणार्या ‘प्रोजेक्ट वारी’ या संगणकीय उपक्रमाचेही लोकार्पण करण्यात आले.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की,
१. पावसाच्या पार्श्वभूमीवर मुक्कामस्थळी आवश्यक सुविधा आणि दिवे घाटात सुरक्षिततेची दक्षता घ्यावी.
२. घाटात नागरिकांची गर्दी टाळून बॅरिकेडिंगची व्यवस्था करावी.
३. उंडवडी कडेपठार येथील जुन्या तुकाराम महाराज पालखी मार्गावरील राडारोडा आणि खड्डे तातडीने दूर करून काम वेगाने पूर्ण करावे, तसेच इंदापूर-पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामाला गती द्यावी.
४. सर्दी-ताप असलेल्या वारकर्यांची तपासणी आणि उपचार यांची व्यवस्था करावी.
विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, विनय कुमार चौबे यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाविषयी माहिती दिली. इतर उपस्थित जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांनीही पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सूचना, तसेच केलेल्या सिद्धतेची माहिती दिली.
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !