युद्ध किंवा सीमावर्ती कारवाई केवळ लष्कराच्या सामर्थ्यावर अवलंबून नसते, तर तिची खरी शक्ती जनतेचा पाठिंबा आणि राष्ट्रभावनेने प्रभावित कृतीशील जनता असते. अशा परिस्थितीत देशाची एकजूट टिकवणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. १४० कोटी भारतीय एकमुखाने भारतीय सैन्याच्या पाठीशी उभे असतांनाही काही विरोधकांनी पहलगाम आतंकवादी आक्रमणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘आतंकवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्याच नाहीत’, अशी भूमिका काहींनी घेतली. भारताने ९ आतंकवादी तळ उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केले. या कारवाईत १०० हून अधिक आतंकवादी ठार झाले. पाकिस्तानने भारतावर डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये पाकिस्तानचे हवाई तळ आणि दारूगोळा भांडार यांची मोठी हानी झाली. यामुळेच पाकिस्तानने नमते घेत भारताकडे युद्धविरामाची मागणी केली आणि ती मान्य झाली.
काही जणांना भारत-पाक युद्ध हवे होते, तर अनेकांनी ‘पाकव्याप्त काश्मीर परत घ्या’, अशी मागणी केली होती. काही जणांनी ‘देश न जिंकलेल्या युद्धाचा विजय साजरा करत आहे’, असे अकलेचे तारे तोडले. पाकने स्वतःच्या झालेल्या हानीची सविस्तर सूचीही प्रसिद्ध केली. भारताचा हेतू साध्य झाला; मात्र भारत-पाक युद्धाची वाट पहाणार्या विरोधकांचा हेतू साध्य न झाल्याने त्यांनी केंद्र सरकारवर टिकेची झोड उठवली.

‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे पाकसह राष्ट्रद्रोही शक्तींना दिलेला एक निर्णायक संदेश !

‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक सैनिकी कारवाई नाही, तर आतंकवादी, पाकिस्तान आणि देशांतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रद्रोही शक्ती यांना दिलेली ही निर्णायक चेतावणी आहे. भारत आता केवळ प्रतिक्रिया देणारे राष्ट्र राहिले नसून तो निर्णायक कृती करणारा, विश्वासार्हता कायम ठेवणारा आणि दायित्वाने कारवाई करणारा देश म्हणून जागतिक पातळीवर उदयास येत आहे. हे यश एका रात्रीत मिळालेले नाही, तर दशकभराची दूरदृष्टी, संकल्प आणि सततचे प्रयत्न यांचा तो परिपाक आहे. हे यश कायम राखायचे असेल, तर राजकीय, सामाजिक आणि वैचारिक स्तरावर ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने एकत्र येणे, हीच काळाची मागणी आहे. राष्ट्रद्रोही शक्तींना ठेचायलाच हवे !
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)
१. देशहितावर राजकीय टीका : काही प्रश्न

भारत सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतला असतांना काही राजकीय पक्ष ‘पुरावे द्या, पारदर्शकता कुठे आहे ?’, अशा मागण्या करतांना दिसतात. देशहिताच्या विषयांवर किमान सर्वपक्षियांची एकजूट अपेक्षित आहे.
अनेक जण विचारतात की, ‘आपण किती विमाने गमावली ?’; पण ते ‘या युद्धात भारतीय सैन्याने किती पाकिस्तानी विमाने पाडली किंवा किती विमानतळे उद्ध्वस्त केली ?’, हे कधीही विचारत नाहीत.
पहलगामच्या आतंकवादी आक्रमणाविषयी काही जण म्हणाले, ‘‘भावाभावांना आपापसांत लढवण्यासाठी ही घटना घडली आहे.’’ पण ‘कोण आणि कुणाचे भाऊ ?’, हे त्यांनी स्पष्ट करावे. अजून किती वेळ या असल्या आतंकवादी ‘भाईं’चा आश्रय व्हायचे आहे ? आतंकवाद्यांनी केवळ हिंदु असल्याने २६ हिंदूंना त्यांच्या पत्नी आणि लहान मुले यांच्यासमोर मारले. ते पुरुष मुसलमान आहेत का ? हे पडताळण्यासाठी त्यांच्या विजारी उतरवल्या. तरीही काही नेते म्हणाले, ‘‘आतंकवाद्यांना इतका वेळ असतो का की, ते कुणाचा धर्म विचारून मारतील ?’’ याचाच अर्थ ‘आतंकवादी आक्रमणातील पीडित कुटुंबे खोटे बोलत आहेत. पीडितांना खोटे ठरवून आतंकवादी ‘धर्मांध’ नव्हतेच’, असे सांगण्याचा खटाटोप का केला ? एका मुख्यमंत्र्यांनी ‘पाकिस्तानशी युद्ध नको’, असे मत व्यक्त केले. पाकिस्तानचा इतका पुळका का ? तसेच ‘त्या आतंकवाद्यांनी महिलांना हातही लावला नाही’, असेही काही जण म्हणाले. आतंकवाद्यांनी महिलांना मारले नाही, केवळ हिंदु पुरुषांना मारले, याविषयी त्यांचे उपकार मानायचे का ? मतांच्या लाचारीसाठी काही राजकीय नेते काहीही विधाने करू शकतात का ?
या घटनेनंतर एक मात्र सिद्ध झाले की, देशाचा शत्रू सीमापारच नाही, तर भारताच्या आतमध्येही दबा धरून बसला आहे. समाजकारण, राजकारण आणि प्रसारमाध्यमे यांत असलेल्या देशशत्रूंचे उघड किंवा छुपे समर्थन करणार्या या विषारी सापांचे काय करायचे ?, हाच प्रश्न आहे.
२. अंतर्गत शत्रूंवर कठोर कारवाईची आवश्यकता
सीमेबाहेर आणि अंतर्गत गृहयुद्ध पुकारणार्या या असल्या लोकांवर आता कडक कारवाई होणे आवश्यकच आहे. या देशद्रोह्यांना ठेचायलाच हवे.
३. भारतविरोधी प्रचार
भारतात चाललेल्या भारतविरोधी किंवा देशद्रोही प्रचाराचा उपयोग पाकिस्तान आणि चीन यांनी माहिती युद्धात (इन्फॉर्मेशन वॉरफेअर) विजय मिळवण्यासाठी पुरेपूर करून घेतला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या प्र

वक्त्याने एका पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर व्हिडिओ दाखवला. त्यात भारताचे प्रसिद्ध पत्रकार करण थापर हे काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मुलाखत घेत होते. या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी सांगितले, ‘पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांना पाकिस्तानी आतंकवाद्यांनी नाही, तर भारतानेच मारले आणि पाकिस्तानवर खोटे आरोप केले.’ पुलवामाचे आक्रमण झाले, तेव्हा सत्यपाल मलिक हे काश्मीरचे राज्यपाल असल्याने त्यांच्या विधानाला महत्त्व दिले जाते.
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर १०० हून अधिक भारतियांचे व्हिडिओ दाखवले, ज्यात हे भारतीय भारतविरोधी भाषा वापरत होते आणि पाकिस्तानची बाजू मांडत होते. थोडक्यात हे भारतीय आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर ‘पाकिस्तानचे प्रवक्ते’ म्हणून काम करत होते आणि हे सिद्ध करत होते की, भारताने किंवा भारतीय प्रवक्त्यांनी दिलेली माहिती चुकीची होती अन् पाकिस्तान जे म्हणत होता, ते योग्य होते.
४. पाकिस्तानला मिळालेला ‘मानसिक विजय’
या युद्धात पाकिस्तानने मोठा मानसिक विजय मिळवला का ? पाकिस्तानने जगाचे लक्ष आतंकवाद किंवा आतंकवादी आक्रमणांपासून काढून घेतले आणि ‘भारत स्वतःच्या नागरिकांचे काश्मीरमध्ये रक्षण करू शकला नाही. पाकिस्तानने भारताची पुष्कळ लष्करी हानी केली आहे. युद्धात भारताचा पराभव झाला आहे आणि पाकिस्तानच्या लष्कराने अधिक चांगली कामगिरी बजावली आहे’, यावर लक्ष केंद्रित केले.
याचा परिणाम असा झाला की, पाश्चात्त्य माध्यमांनी लिहिलेले लेख किंवा संपादकीय बहुतेक वेळा भारताच्या विरोधात, तर पाकिस्तानच्या बाजूने होते. खरेतर पाश्चात्त्य माध्यमांनी भारताचे समर्थन करायला हवे होते; कारण भारत लोकशाही राष्ट्र आहे; परंतु त्यांनी ‘पाकिस्तानी लष्कराच्या कह्यात असलेल्या पाकिस्तानचे म्हणणे योग्य आहे’, असे सांगितले. पाश्चात्त्य माध्यमांनी अशा प्रकारची मते बनवण्यामध्ये भारताच्या आत भारतियांनी केलेल्या देशविरोधी विधानांचा पुरेपूर वापर केला.
थोडक्यात माहिती युद्धात किंवा मानसिक युद्धात भारत पुष्कळच मागे पडला. पाकिस्तानला हे मानसिक युद्ध जिंकण्यात साहाय्य करणार्यांवर देशाच्या आत काय कारवाई करायची, हे भारतीय जनतेने ठरवायला पाहिजे.
५. देशविरोधी प्रचाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना
विदेशातील वर्तमानपत्रांचे अनेक पत्रकार जे भारताच्या विरोधात लिहितात, त्यांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्धही कारवाई करणे आवश्यक आहे, उदा. त्यांच्यावर भारतात बहिष्कार टाकला जाऊ शकतो. त्यांना भारतात येण्यासाठी ‘व्हिसा’ देणे थांबवले जाऊ शकते. एवढेच नव्हे, तर ते ज्या वर्तमानपत्रात लिहितात, त्या वर्तमानपत्रावरसुद्धा बहिष्कार टाकला जाऊ शकतो किंवा त्यांना भारताच्या आत ‘ब्लॉक’ (प्रतिबंध) केले जाऊ शकते. ‘ऑपरेशन सिंदूर’ संपून अनेक दिवस झाले आहेत; परंतु अजूनही हे अपप्रचार युद्ध, दुष्प्रचार युद्ध किंवा मानसिक युद्ध चालूच आहे.
६. नागरिक म्हणून स्वतःचे दायित्व म्हणजे ‘माहितीयोद्धा’ व्हा !
अशा युद्धामध्ये देशभक्त नागरिक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विदेशातील सामाजिक माध्यमे, प्रिंट मीडिया (वृत्तपत्रे, मासिके) किंवा इलेक्ट्रॉनिक मिडिया यांमध्ये जेव्हा जेव्हा भारताच्या विरोधात काही बोलले जाते किंवा लिहिले जाते, त्याला त्या त्या माध्यमांमध्ये लगेचच प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे, उदा. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने जर एखादा भारतविरोधी लेख लिहिला, तर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला ई-मेल पाठवून लेखात दिलेल्या माहितीचे खंडण करायला पाहिजे आणि दाखवून दिले पाहिजे की, त्यांनी लिहिलेला लेख पूर्णपणे चुकीचा आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांची व्याप्ती प्रचंड आहे; म्हणून प्रत्येक सुशिक्षित भारतियाने ‘माहितीयोद्धा’ होऊन अशा भारतविरोधी लिखाणांवर लक्ष ठेवून तिला प्रत्युत्तर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही उत्तरदायित्वे पार पाडण्यासाठी आपण सिद्ध आहोत का ?
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
संपादकीय भूमिकाराजकीय, सामाजिक आणि वैचारिक स्तरावर ‘राष्ट्र प्रथम’ या जाणिवेतून भारतियांनी एकत्र येणे, ही काळाची आवश्यकता आहे ! |
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !