Air India Plane Crash Case : कर्णावतीतील विमान अपघातामागे तुर्कीयेचा हात आहे का ?, याची चौकशी करावी ! – योगऋषी रामदेवबाबा

योगऋषी रामदेवबाबा

नवी देहली – माझ्या माहितीनुसार तुर्कीये देशातील एक आस्थापन बोईंग विमानाच्या देखभालीचे काम पाहात होते. विमान अपघाताची चौकशी करतांना ही गोष्टही लक्षात घेतली पाहिजे.

तुर्कीयेने कर्णावती विमान अपघाताच्या माध्यमातून भारताच्या विरोधात सूड तर उगवला नाही ना ?, या आस्थापनाने अपघाताचा कट रचला नव्हता ना?, अशी शंका योगऋषी रामदेवबाबा यांनी उपस्थित केली. दुसरीकडे या अपघाताची चौकशीसाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणाही अपघातस्थळी पोचलेली आहे.