Bomb Thret In AirIndia Plane : विमानात बाँब ठेवल्याच्या धमकीमुळे थायलंडमध्ये उतरवण्यात आले एअर इंडियाचे विमान !

नवी देहली : थायलंडमधील फुकेट शहरातून नवी देहलीकडे निघालेल्या एअर इंडियाच्या ‘एआय ३७९’ हे विमान आपत्कालीन स्थितीत फुकेट विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानात बाँब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आल्याने ते उतरवण्यात आले.

विमानतळ प्रशासनाने सांगितले की,

विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. विमानात बाँब ठेवल्याची धमकी आली, तेव्हा विमानात १५६ प्रवासी होती. विमानातील इतर तपासणी पूर्ण झाल्यानंतरच सविस्तर माहिती दिली जाईल.