
यांगून (म्यानमार) : म्यानमारमध्ये गेल्या काही वर्षांपासून सैन्य आणि बंडखोर गट यांमध्ये हिंसक संघर्ष चालू आहे. म्यानमारचे सैन्य चिनी लढाऊ विमानांतून बंडखोरांवर बाँब वर्षाव करत आहे. अशाच एका लढाऊ विमानाला बंडखोरांच्या गटाने मशीनगनद्वारे गोळीबार करत खाली पाडल्याची घटना घडली. हे विमान ७२ कोटी रुपयांचे असल्याचे म्हटले जाते.
ज्या मशीनगनने या विमानाला पाडण्यात आले, ती वर्ष १९९३ ची आहे. यातून चिनी लढाऊ विमानांची गुणवत्ता किती हलक्या दर्जाची आहे, हे पुन्हा समोर आले आहे. यापूर्वीच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी चीनने पाकला दिलेली हवाई संरक्षण यंत्रणा भारताने उद्ध्वस्त केली होती, तसेच चिनी क्षेपणास्त्रेही नष्ट केली होती. चीनने अद्याप त्याचे विमान पडल्याच्या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

संपादकीय भूमिकाचीनच्या शस्त्रांची गुणवत्ता यातून पुन्हा उघड झाली आहे. अशा चीनला संपवायला भारताला अधिक वेळ लागणार नाही, असा आत्मविश्वास भारतियांमध्ये निर्माण होत आहे ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण