
पुणे, ७ जून (वार्ता.) – ज्या नदीचे जल वारकरी तीर्थ म्हणून प्राशन करतात, अनेक संतांचे अभंग जिच्या उल्लेखाविना पूर्ण होत नाहीत, अशा इंद्रायणी नदीमध्ये गटारांचे प्रदूषित पाणी सोडले जात आहे. इंद्रायणी नदी पुढे आळंदी आणि-देहू या तीर्थक्षेत्रात जाते, अशा या पवित्र नदीमध्ये आळंदी-देहू मार्गावरील कुदळवाडी-चिखली चौक येथे कारखान्यांतील रसायनयुक्त आणि घरांमधील सांडपाणीमिश्रीत मैला थेट सोडला जात आहे. याकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे.
कुदळवाडी-चिखली येथून येणार्या गटारावरील जलशुद्धी प्रकल्पाची क्षमता अल्प आहे. मोठ्या क्षमतेचा प्रकल्प बसवण्याची मागणी होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत; मात्र कार्यवाही झालेली नाही. आषाढी-एकादशी वारी तोंडावर आली असतांनाही नदीपात्रात सोडल्या जाणार्या दूषित पाण्यावरील प्रक्रियेची कार्यवाही अपूर्णच आहे.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’